आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुपारी हल्ले-प्रतिहल्ले त्यानंतर आजी माजी पंतप्रधानांची भेट, भेटीनंतर मोदींचे ट्वीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी बुधवारी दुपारी परस्परांवर शाब्दिक हल्ले चढवले. यूपीएमध्ये सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र होते, असा आरोप त्यांनी केला तर मी मित्र वा कुटुंबासाठी पदाचा दुरुपयोग कधीच केला नाही, अर्थव्यवस्था दुबळी पडत असताना लोकांचे लक्ष्य विचलित करण्यासाठी भाजप भ्रष्टाचाराची पुंगी वाजवत असल्याचा आरोप त्यांनी केला. आजी-माजी पंतप्रधानांच्या हल्ल्या-प्रतिहल्ल्यावर चर्चा झडत असतानाच सिंग यांनी संध्याकाळी मोदींची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मोदींनी ट्विट केले. ‘मनमोहन सिंग यांना भेटून मला खूप आनंद झाला. भेट उत्तम झाली.’
प्रत्येक मुद्द्यावर बोट
मोदींनी वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत प्रत्येक मुद्द्याला तपशीलवार उत्तर दिले.
भूसंपादन : यूपीएने १२० वर्षे जुना कायदा बदलण्यासाठी १२० मिनिटेही चर्चा केली नव्हती. आताही शेतकऱ्यांच्या हिताच्या सूचना स्वीकारू. मात्र भूसंपादन कायदा मंजूर करूच.
शेतकरी आत्महत्या : राजकीय आकडे सांगून ही समस्या सुटणार नाही. शेतकऱ्यांचे नक्की भले करू.
भविष्यातील योजना : भविष्यात महिला, शेतकरी, शहरी गरीब आणि रोजगारावर लक्ष्य असेल. आम्ही जे काही सुरू केले ते गावागावात पोहोचवू.
प्रत्येक आरोपाचे उत्तर
मनमोहनसिंग यांनी मौन सोडले आणि त्यांच्यावरील आरोपाला उत्तर दिले.
पॉलिसी पॅरालिसिस : यूपीएत पॉलिसी पॅरालिसिस नव्हता. आम्ही सरकार सोडले तेव्हा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान अर्थव्यवस्था होती.
राहुल गांधींवर : २०१४ नंतर काँग्रेसमध्ये नवीन लाट आहे. राहुल संसदेत व बाहेरही सक्रिय आहेत.
मेक इन इंडियावर : मेक इन इंडिया ही आमच्याच नव्या उत्पादन धोरणाची कार्बन कॉपी आहे. आमच्या अनेक योजनांना भाजपने विरोध केला होता.आता त्याच योजना भाजप विकत आहे.
बातम्या आणखी आहेत...