आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmohan Singh Duplicate Ration Card News In Marathi

पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या नावाचे बनावट रेशनकार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक (हरियाणा) - हरियाणाच्या रोहतकमध्ये अन्न व पुरवठा विभागाने चक्क पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाचे बोगस रेशनकार्ड तयार करून ते वितरित केले आहे. हे कार्ड तीन दिवसांपूर्वी बनवण्यात आले असून ते कार्ड क्रमांक 12764 ने जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्डावर पंतप्रधानांच्या घराचा पत्ता हा मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या निवासस्थानाशेजारीच घर क्रमांक 84 असा दाखवण्यात आला आहे.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पत्तादेखील तिथलाच म्हणजे गुवाहाटीचा दाखवण्यात आला आहे. त्यांच्या बनावट रेशनकार्डवर त्यांचा पत्नीसह फोटोही दिसतो आहे. त्यामुळे या कार्डवर अधिका़र्‍यांनी स्वाक्षरी कशी केली असा प्रश्न आहे. या कार्डवर सहायक पुरवठा अधिकारी सुभाष गुप्ता यांची स्वाक्षरी आहे. या कार्डवर दाखवण्यात आलेल्या पत्त्याची शहनिशा केली असता त्या क्रमांकाचे कोणतेच घर त्या ठिकाणी अस्तिवात नव्हते. रोहतकचे जिल्हाधिकारी डॉ. अमित अग्रवाल यांनी सांगितले की, ‘प्रशासनाला अडचणी आणण्यासाठी व त्यांची नामुष्की करण्यासाठी हा खोडसाळ प्रकार केला आहे. या प्रकारासाठी दोषी अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल.’