आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप समाजात फूट पाडण्याचे काम करतो : मनमोहनसिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी/दिब्रुगड/जोरहट - पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी शनिवारी आसाममध्ये प्रचार सभांचा नारळ फोडला.त्यांनी दिब्रुगड आणि जोरहट मतदारसंघातील सीमेवर खुमतई येथे निवडणूक प्रचार सभा घेतल्या.

'जो पक्ष समाजात फूट पाडण्यासाठी काम करतो त्याच्याकडून सुशासनाची आशा कशी करता येऊ शकते. मुख्य मुद्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपने निवडणुकीच्या दरम्यान हल्लाबोल आणि इतर तमाशे सुरू केले आहेत.'

महागाई रोखण्याचा प्रयत्न केला
- गेल्या दहा वर्षात देशाने जी प्रगती केली आहे तशी यापूर्वी कधीही झाली नाही.
- यूपीए सरकार तळागाळातील लोकांचा उद्धार करण्यात यशस्वी ठरली.
- यूपीए सरकारने आरोग्य, शिक्षण, कृ षि आणि पायाभूत विकास कार्यक्रमांना गती देण्याचे काम केले.
- केंद्रातील काँग्रेस आणि बिगर काँग्रेस सरकारांच्या कामाची तुलना होऊ शकत नाही.
- सन 201 7 पर्यंत काँग्रेस पाच कोटी तरुणांचा कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार आहे.
- महागाई एका निश्चित पातळीवर रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.
- भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी यूपीए सरकारने खूप प्रयत्न केले.यापूर्वी कोणत्याही सरकारने हे काम केले नाही.

सरकारच्या कार्यकालाचे मनमोहन यांना श्रेय -पवार
मुंबई - यूपीए-2 मध्ये अनेक त्रुटी होत्या, तरीही सरकारने पाच वर्षे पूर्ण केली. त्याचे सर्व श्रेय पंतप्रधान मनमोहनसिंग यांना द्यायला हवे असे प्रशंसोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.या वेळी मोदी लाट दिसत असली तरीही काँग्रेस-भाजप यापैकी कुणालाही बहुमत मिळणार नाही.सन 2004 च्या जनमत सर्वेक्षणांचे निष्कर्षांच्या अगदे उलट निकाल लागले होते असे ते म्हणाले.