आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी म्हणजे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या विनाकारण केलेले अॅडव्हेंचर - डॉ. मनमोहनसिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाला पुन्हा एकदा अनावश्यक आणि चुकीचा निर्णय म्हटले आहे. ते म्हणाले, 'हे विनाकारण केलेले 'अॅडव्हेंचर' होते. याची देशाला काहीच गरज नव्हती. ते म्हणाले लॅटिन अमेरिका सोडल्यास कोणत्याच लोकशाही देशात नोटबंदी यशस्वी झालेली नाही.' माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी याआधीही नोटबंदीचा निषेध केला आहे. 
 
आयएसबी लीडरशीप समिटमध्ये मनमोहनसिंग सहभागी 
- मनमोहनसिंग शुक्रवारी रात्री मोहाली येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी) लीडरशीप समिटमध्ये सहभागी झाले होते. ते म्हणाले, तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीने नोटबंदीचा निर्णय योग्य नव्हता. नोटबंदीच्या निर्णयापासून गेल्या वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था सतत खाली जात आहे. 
 
खुल्या अर्थव्यवस्थेनंतर परिस्थिती बदलली होती
- मनमोहनसिंग म्हणाले, 'सर्वांना माहित आहे की 1991 मध्ये आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेची कूस बदलली. तेव्हा जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली आणि दारिद्र्य रेषेखालील आयुष्य जगणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली होती.'
- मनमोहनसिंग म्हणाले, 'माझे मत आहे की देशात अजूनही खूप मोठ्या शक्यता आणि संधी आहेत. मात्र त्यावर काम केले पाहिजे. काही आव्हानेही आहेत. उदाहरणार्थ आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात आव्हाने आहेत. काही प्रॅक्टिकल उपाय योजनाचीही भारतीय अर्थव्यवस्थेला आवश्यकता आहे.'
बातम्या आणखी आहेत...