आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस नेते आज जम्मूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ रविवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा आहे. राज्यातील सुरक्षेची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याकडे पाहिले जाते.  
मनमोहन सिंग यांच्यासमवेत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी हे नेते जम्मूला जाणार आहेत. काँग्रेसचे नेते पक्षाच्या स्थानिक आमदार, विधान परिषदेत सदस्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते रविंदर शर्मा यांनी दिली. त्याशिवाय नॅशनल कॉन्फरन्स, माकप, अकाली दलाच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा करतील. 

कोणासोबतही चर्चा करू : राजनाथ 
जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी सरकारला मदत करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ शनिवारी चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राजनाथ यांनी ट्विटरवरून हे आवाहन केले आहे. खुल्या मनाने चर्चा करण्याची आमची तयारी आहे. राज्याचा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा उद्देश आहे. चार दिवसांच्या मुक्कामात स्थानिक संस्थांशीदेखील संवाद साधण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याशिवाय गृहमंत्री अनंतनाग जिल्ह्यातील सीआरपीएफ आणि पोलिस अधिकाऱ्यांशीदेखील सुरक्षेसंबंधी चर्चा करतील.  
बातम्या आणखी आहेत...