आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहन-सोनिया यांचा उत्तराखंडचा हवाई आढावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून/ नवी दिल्ली - नैसर्गिक संकट कोसळलेल्या उत्तराखंडमध्ये चार दिवसांनंतरही वेगवेगळ्या गावांत अनेक लोक अडकलेले आहेत. या चार दिवसांत त्यांना काही खायलाही मिळालेले नाही. सरकार मात्र सर्वतोपरी मदत केल्याचा दावा करत आहे. ‘किती लोक बेपत्ता झाले, किती जणांचा मृत्यू झाला, हे आत्ताच सांगणे कठिण आहे,’ असे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सांगितले. दुसरीकडे, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी हवाई दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. आपदग्रस्तांना 1 हजार कोटींची मदत करण्याची घोषणा पंतप्रधांनानी केली. गौरीकुंड भागात मोठे नुकसान झाले असून, 5 हजार लोक बेपत्ता आहेत. येथील महापुरात तब्बल 300 ते 400 गाड्या वाहून गेल्या आहेत.