आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manohar Lal Khattar Haryana Police Commandos Escape Dera Pramukh Ram Rahim From Panchkula Court

पंजाब पोलिसांचे कमांडो बाबाला पळून जाऊ देणार होते: मुख्यमंत्री खट्टर यांचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पंचकुलामध्ये जमलेली गर्दी आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसेचे खापर पंजाबवर फोडले आहे. ते म्हणाले की, बलात्कारातील दोषी निश्चित झाल्यानंतर राम रहीमला पंचकुला कोर्टातून पळवून नेण्याचा पंजाब पोलिसांचा मोठा कट होता.
-दिल्लीत एका टीव्ही चॅनलवर खट्टर म्हणाले, दुर्दैवाने बाबाला झेड सिक्युरिटी हरियाणाने दिली होती, परंतु यातील 8 कमांडो पंजाब पोलिसांचे होते. हे कोणत्या अॅथॉरिटीने पाठवले होते हे आम्हाला माहिती नाही, आमच्या पोलिसांकडे एक-एकच हत्यार होते, त्यांच्या आठच्या आठ पोलिसांकडे 2-2 हत्यारे होती. हरियाणाचे पाच कमांडो आम्ही बरखास्त केले आहेत. पंजाबचे कमांडोही पकडण्यात आले आहेत. जर बाबा पळाला असता तर मोठा गहजब होणार होता. परंतु आमचे पोलिस, पॅरामिलिटरी फोर्सने त्यांचा कट उधळला.
 
आमच्यावर कोणताही दबाव नव्हता...
- पत्रकारांनी विचारले की, तुमच्यावर पंचकुलामध्ये लोकांची गर्दी जमा होऊ देण्यासाठी बाबाचा काही दबाव होता का? यावर खट्टर म्हणाले की, आमच्या कोणतेही प्रेशर नव्हते, पूर्वीच्या अनुभवाने आम्ही आधीच तयार होतो.
- खट्टर म्हणाले, राम रहीमच्या डेऱ्यात 1 लाख लोक थांबू शकतील अशी व्यवस्था आहे. जर बाबा कोर्टात आला नसता तर किती नुकसान झाले असते याचा आम्ही अंदाज बांधला होता.
- राम रहीमचे अनुयायी हरियाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल, दिल्ली, उत्तर प्रदेशातून लाखोंच्या संख्येने आहेत. जर काही विपरीत घडलेच असते तर या लाखो भक्तांच्या समोर फोर्सेस आणि या फोर्सेसच्या मागेही तितकेच लाखो भक्त असल्यावर काय परिस्थिती निर्माण झाली असती, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
 
मीडियावर लिमिटेशन गरजेची
-पंचकुलामध्ये 25 ऑगस्टला एका न्यूज चॅनलच्या 3 ओबी व्हॅन डेरा समर्थकांनी पोलिसांच्या डोळ्यांदेखत उभ्या जाळल्या. असे का झाले? यावर खट्टर म्हणाले, मला एवढेच म्हणायचे आहे की, तेथे 12 ओबी व्हॅन होत्या. 9 तिथून हटल्या होत्या. 3 जणांनी हटवल्या नाहीत. त्या जळाल्या. शेवटी मीडियावरही एक लिमिटेशन असली पाहिजे. सिक्युरिटी लक्षात घेऊन पोलिस जे सांगतात ते त्यांनी ऐकले पाहिजे.
 
पंजाबबद्दल हे म्हणाले
- पंजाबमध्ये कोणतीही हिंसा घडली नाही, या पंजाबचे सीएम अमरिंदरसिंग यांच्या दाव्यावर खट्टर म्हणाले, डेरा हरियाणात आहे, रूट हरियाणात आहे, कोर्ट हरियाणात आहे, पूर्ण आखाडा हरियाणाच आणि ते मात्र स्वत:ची पोठ थोपटताहेत काही आम्ही आमच्याकडे काही हिंसा होऊ दिली नाही. तेथेही अनेक पोलिस चौक्या जळाल्या, त्यांनीही डझनभर लोकांना अटक केली, तेथेही लाठीचार्ज झाला, तेथेही वीजयंत्रणा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. 
- जे जखमी झाले, त्यातील तब्बल 50 टक्के पंजाबचे होते. आम्ही पिटाळल्यावर त्यांनी 25 तारखेच्या संध्याकाळी त्यांच्या 1200 बसेसमधून पंजाबमध्ये गेले. त्यांना कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. उलट ते तर म्हणाले होते की, हरियाणा जळत असेल तर जळू द्या!
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...