आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्रिकर म्हणाले- मोदींनी कॅबिनेटची ऑफर दिल्याने हैरान, निर्णय घेण्यासाठी लागले 2 आठवडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - नरेंद्र मोदींनी कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली होती, तेव्हा कोणीतरी डोक्यावर बॉम्ब फोडला असे वाटले होते, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले आहेत. मोदींनी दिलेल्या मंत्रीपदाच्या ऑफरवर निर्णय घेण्यासाठी दोन महिने लागल्याचेही पर्रिकरांनी सांगितले.
पर्रिकर मंगळवारी पणजीत होते. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या 60 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमात पर्रिकरांनी केंद्रीय मंत्रीपद स्विकारण्यापूर्वीची त्यांची मनःस्थिती सांगितली. यावेळी पर्रिकरांनी गोवा ते नवी दिल्ली प्रवासातील काही खास गोष्टी शेअर केल्या.

- पर्रिकर म्हणाले, 26 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलो होतो. माझ्या भेटीचा उद्देश राज्यातील खाण उद्योगाला अनुदान मिळवण्याचा होता.
- ते म्हणाले, 'जेव्हा मी पंतप्रधानांसोबत यावर चर्चा करत होतो तेव्हा ते म्हणाले, आम्ही हे सर्व तर करूच. पण मला सांगा तुम्ही माझी कॅबिनेट केव्हा जॉइन करणार आहात ?'
- संरक्षण मंत्री म्हणाले, 'मोदीजींनी मला मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर दिली तेव्हा एखादा बॉम्ब माझ्यावर पडला असे मला वाटत होते.
- 'पर्रिकरांनी पंतप्रधानांची ऑफर ऐकल्यानंतर त्यांना विचार करुन उत्तर देतो असे सांगितले.'
- पर्रिकर म्हणाले, ' ते ऐकल्यानंतर मी पुढील दोन-तीन महिने तरी दिल्लीत यायचे नाही असे ठरवूनच परतलो होतो. मात्र चार-पाच दिवसांमध्येच मला पंतप्रधानांचा मॅसेज आला.'
- ते म्हणाले, 'त्यानंतर मी 6 नोव्हेंबरला कॅबिनेटमध्ये सहभागी होण्याचे नक्की केले आणि 8 तारखेला गोवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.'
- पर्रिकरांच्या राजीनाम्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
बातम्या आणखी आहेत...