आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manohar Parrikar Filed Nomination From UP For Rajya Sabha

राज्यसभेसाठी पर्रीकरांचा उत्तर प्रदेशातून अर्ज, निवडणुकीची घोषणा 20 नोव्हेंबरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठी नामांकन अर्ज भरला. त्यांच्या निवडणुकीची औपचारिक घोषणा २० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरल्यानंतर पर्रीकर म्हणाले की, ‘मी आज माध्यमांसमोर सुरक्षेविना उभा आहे. मात्र, शत्रूंसमोर आपण नेहमी सज्ज राहू, असे आश्वासन देऊ इच्छितो.’ उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागा २५ नोव्हेंबर रोजी रिक्त होत आहेत. आमदारांच्या संख्येच्या आधारे सपाचे सहा, बसपचे दोन आणि काँग्रेस-भाजपतील प्रत्येकी एका उमेदवाराची निवड होईल. आतापर्यंत १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताना पर्रीकर यांच्यासोबत कलराज मिश्र आणि राजीव प्रताप रुडी उपस्थित होते.
थोडा वेळ द्या, मग उत्तरे देईन
‘संरक्षणमंत्रिपद मिळाल्याची बातमी मला रविवारी रात्री ११.३५ वाजता मिळाली. सध्या मला याविषयी फार माहिती नाही. मी यापूर्वी कधीही केंद्रीय अथवा संरक्षणमंत्री नव्हतो. मला हे खाते समजून घेण्यासाठी आठवडाभराचा वेळ द्या. पंतप्रधानांशीही याविषयी मी चर्चा करीन. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन.’ - मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री