आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दबाव\' होता म्हणून संरक्षण मंत्रिपद सोडले, गोव्यात मनोहर पर्रिकर यांचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
पणजी - गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपद सोडून राज्यात का परतण्याचे नेमके काय होते, यासंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. केंद्रात असताना काश्मीर प्रश्नासह इतर काही महत्वाच्या प्रकरणांचा दबाव होता, त्यामुळेच आपण संरक्षण मंत्रिपद सोडल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
गेल्या महिन्यातच केंद्रातील महत्वाचे मंत्री पद सोडून गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे मनोहर पर्रिकर यांनी आपल्या केंद्रातील अनुभवांवर शुक्रवारच्या एका कार्यक्रमात दिलखुलास चर्चा केली.
 
यावेळी ते म्हणाले...
- "केंद्रात असताना काश्मीरसह विविध प्रकरणांवरन एक दबाव होता. त्यामुळेच, संरक्षण मंत्री पद सोडण्यामागे हे एक महत्वाचे कारण होते. त्यातच गोव्यात मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आणि मी राज्यात परतण्याचा निर्णय घेतला. केंद्रात असताना तुम्हाला काश्मीरसह अनेक प्रकरणे सोडविण्याचा दबाव असतो."
- "मुळात दिल्ली माझे कार्यक्षेत्र नाहीच. त्या ठिकाणी असताना सतत मी आपल्यावर दबाव अनुभवत होतो. काश्मीर प्रश्न काही सोपा नाही. यासाठी दीर्घकालीन धोरण अत्यावश्यक आहे. आणखी काही बाबी आहेत, ज्यावर चर्चा न केलेलीच बरी..." यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आपले राजकारणातील आदर्श गुरू असून त्यांचे किमान काही गुण तरी आत्मसाद करण्याचा प्रयत्न करेन असेही पर्रिकर यांनी व्यक्त केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...