आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Manohar Parrikar Says For Last Two Days, The Firing Has Stopped From Across The Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आमच्या हल्ल्याने PAKची कारवाई थांबवण्याची विनंती, दोन दिवसांपासून गोळीबार नाही'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - दोन दिवसांपासून सीमेपलिकडून होणारा गोळीबार थांबला आहे. शत्रूला कळून चूकले की त्यांना तोडीसतोड उत्तर मिळणार आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बॉर्डरवर वारंवार हल्ले होत होते. त्यांना भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने 29 सप्टेंबर रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून 300 वेळा सीजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे.
- भारत-पाकिस्तान यांच्यात डीजीएमओ स्तरावरील बातचीत झाल्याचा दावा, पर्रिकरांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात केला.
- ते म्हणाले, एक दिवसापूर्वी पाकिस्तानातून फोन आला होता. त्यांनी विनंती केली की भारताकडून होणारा गोळीबार थांबावावा.
- आम्ही त्यांना सांगितले, की प्रत्युत्तरात केलेली कारवाई थांबवण्यात काहीच अडचण नाही. कारण हे आम्हालाही पसंत नाही. मात्र त्याआधी सीमेपलिकडून होणारा गोळीबार थांबला पाहिजे. दोन दिवसांपासून सीमेपलिकडून गोळीबार झालेला नाही.
पाकिस्तानविरोधात एवढी कठोर भूमिका का घ्यावी लागली ?
- जम्मू-कश्मीरच्या कुपवाडातील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सीमा कृती पथकाने (बॅट) भारतीय गस्ती पथकावर दबा धरून हल्ला केला. त्यात तीन जवान शहीद झाले.
- नंतर एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी सैनिक पळून गेले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
- २९ सप्टेंबर रोजी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर आजवर १८ जवान सीमेवरील गोळीबार आणि हल्ल्यात शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबरला उरीतील कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.
बातम्या आणखी आहेत...