मनप्रीत यांचे घर फौजींच्या डेऱ्याच्या नावाने परिसरात प्रसिध्द आहे. त्यांचे दोन मोठे भाऊ भूपेंद्र आणि गुरजिंदर सिंह हे सुध्दा सैन्यात आहेत. त्यांचे दोन चुलत भाऊसुध्दा सैन्यात आहेत. काका सुखदेव सिंह सैन्यातून निवृत्त झाले आहेत. भाऊ भूपेंद्र सिंह म्हणाले की, माझा भाऊ शहीद झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. तर पत्नी रणजीत कौर म्हणाल्या की, आत्ता एक दिवसापूर्वीच त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. या दरम्यान फोनवर गोळीबार होत असल्याचा आवाज येत होता. मी त्यांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, येथे नेहमीच फटाके फुटत असतात. घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यानंतर शुक्रवार संध्याकाळी त्यांच्या शहीद होण्याची बातमी आली. तर शहीद मनप्रीत यांच्या तीन वर्षीय मुलाने
आपल्या बोबड्या बोलीमध्ये सांगितले की, पप्पा ड्यूटीवर गेले आहेत. ते तेथून माझ्यासाठी एक विमान आणणार आहेत. मी सुध्दा पप्पाप्रमाणेच सैन्यात भरती होणार आणि शत्रुंना ठार करणार.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे इतर फोटो...