आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसरोवर यात्रेकरूंना रोखले, ‘काली’ला पूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारचुला (पिठोरागड) - मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रेत अडथळा आला असून पिठोरागड जिल्ह्यातील दोभाट व कालापानी मार्गावर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे यात्रेकरूंची तिसरी व चौथी तुकडी रोखून धरण्यात आली आहे. या तुकड्या अनुक्रमे गुंजी व धारचुला येथे थांबवण्यात आल्या आहेत. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

चीनमधील कैलास मानसरोवर यात्रेला १५ जूनला प्रारंभ झाला आहे. दोन तुकड्या नाथुला खिंडीमार्गे रवाना झाल्या आहेत. एका तुकडीत ५५ ते ६० यात्रेकरूंचा समावेश आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत चालणार्‍या यात्रेत मुसळधार पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. चीनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतात गुंजी येथे यात्रेकरूंची तपासणी केली जाते. त्यानंतर यात्रेकरू चीनमध्ये प्रवेश करतात. चीन सरकारतर्फेदेखील यात्रेकरूंची तपासणी केली जाते. तकलाकोटमार्गे त्यांना कैलासाच्या दर्शनासाठी नेले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. भारत - नेपाळ सीमेवरून वाहणार्‍या काली नदीची पाणीपातळी वीस फुटांनी वाढली आहे.
अहिदोभाट आणि कालापानी परिसरात दरडी कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. धौलीगंगा प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाणी सोडण्याची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : धौलीगंगा प्रकल्प एलागाड येथे असून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढत आहे. धरणाचे सात दरवाजे उघडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. काली नदी आधीच २० फूट पाणीपातळीवरून वाहत आहे. त्यातच धरणाचे पाणी नदीत सोडले, तर पूर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काली नदीकाठच्या धारचुला, गोठी, पांगला, जालजुबी, पांगू, गर्भाधार आदी गावांना सशस्त्र सीमा दलाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. २०१३ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत गोठी येथील तळ वाहून गेला होता, अशी माहिती कमांडंट राजेश ठाकूर यांनी दिली.

सर्व प्रवासी सुखरूप
दरम्यान, कैलास मानसरोवराला जाणारे सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत. त्यांना धारचुला येथील कुमाऊं मंडळ विकास निगमच्या विश्रामगृहात थांबवण्यात आले आहे. गंुजी येथील इंडो - तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या (आयटीबीपी) तळावर तिसरी तुकडी थांबवण्यात आली आहे. रस्ता सुरळीत झाल्यानंतर या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात येईल, अशी माहिती केएमव्हीएनचे धारचुला येथील व्यवस्थापक दिवानसिंह बिष्ट यांनी सांगितले.

१८ तुकड्या वर
भारतातील आदिकैलास यात्रेसाठी ८ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. कैलास मानसरोवर यात्रेकरूंच्या ६० जणांच्या तुकडीसाठी ४० ते ५० घोडे व तेवढेच पोटर्स असतात. त्यामुळे एक तुकडी १०० व्यक्ती व ५० घोड्यांची आहे.
बातम्या आणखी आहेत...