आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Laws Are Not Fair, Said Rajsthan Governor Margaret Alwa

अनेक कायदे कचरापेटीत फेकण्याच्या लायकीचे,राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचे वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - इंग्रजांनी केलेल्या कायद्यांचा अद्यापही आपण अवलंब करीत असून अनेक कायदे असे आहेत ज्यांना कचरापेटीत फेकून द्यायला हवेत, अशा कडक शब्दांत राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी आपले मत मांडले. राष्‍ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
न्यायालयांनी आपल्या गरजेनुरूप कायद्यात बदल करून घेतला आहे, परंतु सामान्य जनतेसाठी असलेले कायदे अद्यापही कायम आहेत असेही त्या म्हणाल्या. ब्रिटिशांच्या नियमांवर हल्ला चढवत अल्वा यांनी सांगितले की, दीक्षांत समारंभावेळी विद्यार्थ्यांना टोपी आणि गाऊन घालण्याचा प्रतिबंध लावू नये. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपण ब्रिटिशांच्या नियमांचे पालन करतोय, ही बाब दुर्भाग्यपूर्ण आहे. विग, काळे कोट आणि गाऊन हे गुलामीचे प्रतीक असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. भारतीय न्यायव्यवस्थेत सामील ब्रिटिश कार्यपद्धती कचरापेटीत फेकण्यालायक असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला न्यायाधीशांच्या संख्येबाबतही चिंता
भारतात प्रति 10 लाख नागरिकांमागे 10.5 न्यायाधीश कार्यरत आहेत. अमेरिकेत ही संख्या 10 लाखांमागे 104 इतकी आहे. देशात हे प्रमाण वाढवायला हवे असेही अल्वा म्हणाल्या. देशात महिला न्यायाधीशांचे प्रमाण फक्त 10 टक्के आहे. शिक्षित, अनुभवी महिला वकील असूनही त्यांना नेतृत्वाची संधी दिली जात नसल्याची चिंताही अल्वा यांनी व्यक्त केली.
माय लॉर्ड म्हणतो, तर माय लेडी का नाही?
न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान न्यायाधीशांसाठी मार्य लॉर्ड किंवा लॉर्ड शीप अशी विशेषणे वापरली जातात. मुळात हे ब्रिटिश काळातील परंपरागत शब्द आहेत. जर आपण याच परंपरेचे
पाईक आहोत तर महिला न्यायाधीशांसाठी ‘माय लेडी’ हे विशेषण का वापरत नाही? असा सवालही त्यांनी या वेळी केला. त्यांनी कायद्याच्या घसरत्या विश्वासार्हतेवरही चिंता व्यक्त केली आणि कार्यालयात होणा-या लैंगिक शोषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा सल्लाही दिला.