आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Learn Computer In Bhaskar's Computer Education Programme

८००० ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतले संगणक प्रशिक्षण, "भास्कर समूहा'चे अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - "मी बुटीकमध्ये काम करते. दैनिक भास्कर समूहाच्या संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात कॉम्प्युटर शिकले. आता मी सहजतेने माझ्या बुटीकचे डिझाइन इंटरनेटवर शेअर करू शकतेे. तसेच लेटेस्ट डिझाइनची माहितीदेखील मिळवू शकतेे. भविष्यात उपयोगी पडू शकेल असा माझ्या व्यवसायाचा डाटा एक्स्लेमध्ये स्वत: सेव्ह करू शकते. सोबतच मुलांना घरीच गाइडदेखील करू शकते. ' हे म्हणणे आहे जमशेदपूरच्या हेमलता अग्रवाल यांचे. "भास्कर समूहा'च्या संगणक प्रशिक्षणात सहभागी झालेले स्पर्धक संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यानंतर आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसत आहेत. अनेक जणांसाठी हे ज्ञान त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरत आहे. तर काही जणांनी कुटुंबीय, मित्रमंडळींसोबत इंटरनेट कनेक्ट राहण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग सुरू केला आहे.

"भास्कर समूहा'तर्फे १० राज्यांत ३४ शहरांत चालवण्यात येणाऱ्या या नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रमात आतापर्यंत ८००० पेक्षा जास्त महिला व ज्येष्ठ नागरिकांनी संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळवले आहे. हेमलता अग्रवाल यांच्याप्रमाणे ग्वाल्हेरच्या सुप्रीती श्रीवास्तव यांनीही हे संगणक प्रशिक्षण अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले. रेल्वेगाड्यांची चौकशी करणे, ऑनलाइन शॉपिंग, बिले भरणे यासारखी कामे आता मला जमू लागली आहेत. शिवाय मैत्रिणींसोबत मी फेसबुकवर चॅटही करू शकते.

एनजीओतर्फेही प्रशिक्षण
या प्रशिक्षण कार्यक्रमात एनजीओ हेल्पएजदेखील सहभागी झाली आहे. ही संस्था ज्येष्ठ नागरिकांची मदत करते. या संस्थेच्या वतीने चंदिगड येथे ज्येष्ठ नागरिकांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले. हेल्पएज इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख अधिकारी मंजिरा खुराणा यांनी संागितले, तंत्रज्ञान व बदलांशी जुळवून घेता न आल्याने ज्येष्ठ नागरिक स्वत:ला एकाकी समजू लागतात. संगणक प्रशिक्षणातून त्यांना या वयातही अनेक मार्ग खुले होतील. तसेच त्यांना नव्या पिढीमध्ये मिसळण्याची संधीदेखील मिळते.