आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many People Dead Due To Landslide In Tawang Arunachal Pradesh

अरुणाचल: ढगफुटीनंतर दरड कोसळून 16 ठार, ढिगाऱ्याखाली दबले कित्‍येक लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटानगर/ नवी दिल्‍ली - अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात १६ जणांचा मृत्यू झाला. पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.तवांगपासून सहा किमी अंतरावर फामला गावात सुरू असलेल्या एका बांधकामावरील मजूर राहुट्यांमध्ये झोपलेले असताना अचानक भूस्खलन झाले. यात राहुट्यांतील मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. १६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमी मजुरास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या भूस्खलनामुळे एक शाळाही दबली गेली असून काही निवासी इमारतींचेही नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन व लष्कराच्या जवानांनी मदत व बचावकार्य सुरू केले. मात्र, तोवर १६ जण गतप्राण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मृतांमध्‍ये आसामचे लोक अधिक...
- मृतांमध्‍ये आसामचे 13 जण असल्‍याचे सांगितले जात आहे.
- आसामहून येथे रोजगाराच्‍या शोधात हे लोक आले होते.
- आसाम, सिक्किम, अरुणाचलच्‍या काही भागात गेल्‍या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे.
- पावसामुळे आसाम आणि अरूणाचलमध्‍ये दोन दिवसांपूर्वी भुस्‍खलन झाले होते.
- या दुर्घटनेमुळेही कित्‍येक रस्‍ते बंद झाल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले होते.
- मीडिया रिपोर्टनुसार ढिगा-याखालून आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्‍यात आले.
परिसर आहे संवेदनशिल....
- भुस्‍खलनाच्‍या दृष्‍टीने तवांग हिमालयातील सर्वात संवेदनशिल भाग मानला जातो.
- अरुणाचलचा तवांग जिल्‍हा तिबेट आणि भूटानच्‍या सिमेवर आहे.
- हिमालयापासून 3500 मीटर उंचीवर हा जिल्‍हा आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, दुर्घटनेचे फोटो.....