आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manya Surve Was Big Enemy Of Underworld Don Dawood Ibrahim

मुंबईच्या या गँगस्टरची होती दाऊदला दहशत, नाही घेऊ शकला भावाच्या हत्येचा बदला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाचा दुश्मन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात दडून बसला आहे. dainikbhaskar.com ने पाकिस्तानात जाऊन दाऊद तिथे असल्याचे आणि त्याच्या संपत्तीचे पुरावे गोळा केले. कित्येक वर्षांपासून भारत सरकार दाऊदच्या जवळही फिरकू शकलेली नाही. या मालिकेत आज आम्ही सांगणार आहोत दाऊदच्या शत्रूबद्दल. याच्यात हिंमत होती दाऊदला त्याच्या घरात घुसून मारण्याची. हा होता एक मराठी गँगस्टर , मन्या सर्वे त्याचे नाव. मन्याने भर रस्त्यावर दाऊदच्या भावाचा खून केला होता. अंडरवर्ल्ड डॉन त्याचा बदला देखील घेऊ शकला नाही. असे बोलले जाते की मन्या हा एकमेव असा गुंड होता जो दाऊदला आव्हान देत होता आणि त्याला संपवण्याची भाषा करत होता.

मन्याचे पूर्ण नाव मनोहर अर्जून सुर्वे. त्याचा जन्म 1944 मध्ये झाला आणि 11/01/1982 रोजी एन्काउंटरमध्ये तो ठार झाला.

1970 ते 80 च्या दशकात मन्या मुंबईतील पॉवरफूल गँगस्टर होता. मायानगरी मुंबईत त्याच्या नावाची दहशत होती. पण हे फार कमी लोकांना माहित आहे की मन्या सुर्वे दाऊद आणि त्याचा भाऊ साबीर इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू होता. मन्याने या दोघा भावांविरोधात आणि अफगानी माफियांविरोधात बराच काळ झुंज दिली होती. तो पदवीधर होता.

ग्रॅज्यूएटचा झाला गँगस्टार मन्या
मन्या सुर्वे हा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील होता. त्याचे खरे नाव मनोहर असले तरी त्याच्या गँगमधील पंटर त्याला मन्या नावाने बोलावत होते. त्यामुळे पोलिस रेकॉर्डमध्येही त्याचे नाव मन्याच आहे. तो मुंबईतच लहानाचा मोठा झाला. किर्ती कॉलेजमधून त्याने बी.ए. केले होते. जेव्हा तो गुन्हेगारी जगतात आला तेव्हा त्याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करुन घेतले होते. त्याला गुन्हेगारी जगतात घेऊन आला त्याचा सावत्र भाऊ भार्गवदादा. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती. मन्याने पहिला खून केला तो 1969 मध्ये दांडेकर नावाच्या व्यक्तीचा . या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती.

जेलमध्ये खाली पडत नव्हता मन्याचा शब्द
पुण्याच्या येरवडा तुरुंगात मन्याने थोड्याच दिवसात दबदबा निर्माण केला होता. तिथे गुंड आणि गुन्हेगारांसोबत राहून तो आणखी खतरनाक झाला. तुरुंगात तो दुसऱ्या गँगच्या लोकांना मारझोड करीत होता. तुरुंगात त्याला गुन्हेगारी कारनाम्यांचा छडा लावणाऱ्या विदेशी कादंबऱ्या वाचण्याचा छंद लागला. यातून त्याला गुन्हेगारीसाठी नव्या-नव्या कल्पना (मोडस ऑपरेंटी) सुचू लागल्या होत्या. येरवड्यातून त्याला रत्नागिरी तुरुंगात शिफ्ट करण्यात आले. तिथे त्याने उपोषण सुरु केले. प्रकृती बिघडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. तो दिवस होता 14 नोव्हेंबर 1979. जन्मठेपेचा कैदी पळून पुन्हा आपल्या मुंबईत आला आणि स्वतःची गँग सुरु केली.
पुढील स्लाइडमध्ये, मन्याच्या एन्काउंटर नंतर दाऊद बनला डॉन