आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maoist Attack On A Police Station In Gaya, A Death

नक्षली हल्ल्‍यात एकाचा मृत्‍यू, पोलिस ठाणे लुटण्‍याचा प्रयत्‍न फसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया(बिहार)- गयाजवळील 'आमस' पोलिस ठाण्‍यावर काल (शनिवार) रात्री अकराच्या सुमारास नक्षलवाद्यांनी हल्‍ला केला. या हल्ल्यामध्ये एका व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला. मृत व्‍यक्‍तीचे नाव राजीव दास असून तो इंडिका कारद्वारे ओडिसाहून बिहारमधील औरंगाबादला जात होता.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्‍ये रात्री दोन वाजेपर्यंत चकमक सुरु होती. नक्षलवाद्यांनी पोलिस ठाण्यावर बेछुट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. पोलिसांची संख्या वाढल्यावर नक्षलवाद्यांनी माघार घेतली.

पुढील स्‍लाइडवर वाचा, नक्षलवाद्यांचा पोलिस ठाणे लुटण्‍याचा बेत कसा फसला