आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माओवाद्यांच्या बिहार-झारखंड बंदला हिंसक वळण, 40 वाहने पेटवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- प्रतिबंधित नक्षली संघटना 'भाकप'च्या माओवाद्यांकडून पुकारलेल्या दोन दिवसीय (सोमवार-मंगळवार) 'बिहार-झारखंड' बंदला हिंसक वळण लागले आहे. माओवाद्यांनी दोन्ही राज्यांत जाळपोळ सुरु केली आहे. आतापर्यंत त्यांनी 40 पेक्षा जास्त वाहने पेटवली आहेत. तसेच गया जिल्ह्याचे एसएसपीला लोकन्यायालयात शिक्षा देण्याची धमकीही दिली आहे.

माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरु करणारे एसएसपी मनु महाराज यांच्यासह सीआरपीएफचे साहाय्यक कमांडोजला लोकन्यायालयात शिक्षा देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, सीआरपीएफ, एसटीएफ आणि बिहार मिलिट्री पोलिसच्या (बीएमपी) कमांडोजनी नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरु केले आहे.

बिहारमध्ये 32 ट्रक खाक
बिहारमधील गया जिल्ह्यातील जीटी रोडवर उभे असलेले 32 ट्रक माओवाद्यांनी रविवारी रात्री पेटवले. यापूर्वी ठिकठिकाणी पोस्टर चिटकावून माओवाद्यांनी हल्ल्याची धकमी दिली होती. पोस्टरमध्ये गयाचे एसएसपी मनु महाराज, सीआरपीएफ कोबरा बटालियनचे कमांडेंट नीरज कुमार, कंपनी कमांडेंट ओमप्रकाश तिवारी आणि बाराचट्‌टीचे निरीक्षक रविप्रकाश सिंह यांना लोकन्यायालयात शिक्षा देण्याची धमकी देण्यात आली होती.

मनु महाराज यांनी सांगितले की, शेकडो माओवादी शस्त्रास्त्र घेऊन रविवारी रात्री जीटी रोडवर पोहोचले. त्यांनी अनेक ट्रक थांबवल्या आणि त्यांना पेटवून दिले. घटनेची दखल घेत सुरक्षा जवानांनी 'सर्च ऑपरेशन' ऑपरेशन सुरु केले आहे. या घटनेची चौकशी करण्‍यासाठी बिहारचे डीजीपी स्वत: घटनास्थळाची पाहाणी करणार आहे.

झारखंडमध्येही हिंसा
झारखंडमध्ये हजारीबाग जिल्ह्यात माओवादियांनी काही ट्रक पेटवल्याल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पलामू जिल्ह्यात हरिहरगंज पोलिस ठाण्याच्या परिसरा अनेक वाहने पेटवली आहे. खासगी बसेस रस्त्यावर थांबवून प्रवाशांना खाली उतरवून बस पेटवून देण्‍यात आल्या.
त्याचप्रमाणे पलामू जिल्ह्यातील सरईडीह येथे एक मोबाईल टॉवर माओवाद्यांनी उडवले आहे.
बिहारसह झारखंडमध्ये नक्षली प्रभावित सर्व जिल्ह्यात कडकडीत बंद आहे. सरकारी तसेच खासगी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही राज्यात पेट्रोल पंप बंद आहेत.
दरम्यान, बिहार-झारखंड-छत्तीसगड स्पेशल एरिया समितीच्या सदस्य आणि माओवादी सरिता गंझू पोलिस चकमकीत ठार झाली होती. याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्‍यात आला आहे. झारखंड सरकारने माओवादी सरितावर 15 लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, माओवाद्यांनी केलेल्या जाळपोळीचे व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...