आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी कमांडरने केली दोघांची हत्या; मृतदेहांसोबत फोटोही केले क्लिक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/गुमला- झारखंडची राजधानी रांचीपासून जवळच असलेल्या गुमला जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी ही घटना समोर आली. उल्लेखनीय म्हणजे नक्षलवाद्याने मृतदेहांसोबत फोटोही काढले आहे. दोन्ही नागरिक गुन्हेगार होते म्हणून त्यांची हत्या केल्याचे नक्षली कमांडर बीरबल याने जाहीर केले आहे.

तिघांना ठार मारायचे होते, परंतु एक जण आमच्या हातून निसटल्याचे बीरबल याने म्हटले आहे. तिघे आमच्यासाठी आरोपी होते. त्यांनी माफी मागितली असती तर त्यांना सोडून दिले असते. परंतु ते कोणत्याही अटीवर माफी मागालयला तयार नव्हते अखेल त्यांची हत्या करावी लागल्याचे बीरबल आहे.

ग्रामस्थांनी केली होती तक्रार...
गुमला जिल्ह्यातील घाघरा ठाण्यातील बरांग गावात ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. रोहित कुमार (22 ) आणि राजमन उरांव (25) असे मृतांची नावे आहे. तर त्यांचा एक साधीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. फूलचंद उरांव असे त्याचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, या तिघांनी आजूबाजूच्या परिसरात चोरी केली होती. तसेच काही ग्रामस्थानाही मारहाण केली होती. या तिघांच्या छळाला परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नंतर ग्रामस्थांनी या तिघांची तक्रार नक्षली कमांडर बीरबल याच्याकडे केली होती.

(फोटो : दोन नागरिकांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहासोबत फोटो काढताना कमांडर बीरबल)