आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उडवली निवडणूक कर्मचार्‍यांची बस; सात ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडमधील दुमका जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज (गुरुवारी) घडवून आणलेल्या सुरुंग स्फोटात निवडणूक कर्मचार्‍यांची बस उडवून दिली. त्यात सात जणांचा मृत्यू झाला.

मतदात संपल्यानंतर निवडणूक कर्मचारी इव्हीएम मशीन घेऊन जात होते. नक्षलवाद्यांनी रस्त्यावर भू-सुरुंग पेरून ठेवले होते. या हल्ल्यात सात लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 24 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला.