आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maoists Blow Up Mobile Towers Ahead Of Modi Rally In Bihar

बिहारमध्ये नक्षली हल्ला, मोदींच्या सभेआधी दोन मोबाईल टॉवर उडविले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया - नक्षलवाद्यांनी गया जिल्ह्यात दोन शक्तीशाली स्फोट घडवून मोबाईल टॉवर उडवून दिले आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर हे स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. यात जीवित हानी झाली नसली तरी, डुमरिया गावासह संपूर्ण गया जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. नक्षलवाद्यांनी आज (गुरुवार) संपूर्ण बिहार आणि झारखंड बंदची घोषणा दिली आहे. विशेषम्हणजे, आज बिहारमध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचार सभा आहेत. त्याआधी हे स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश एटीएसने अयोध्येतून दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघेही पाकिस्तानातून आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण घेऊन आल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणूक काळात घातपाती कारवायांची सुचना गुप्तचर संस्थांनी याआधीच दिली होती.
दरम्यान, गया जिल्ह्यात झालेल्या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. गयाचे पोलिस अधिक्षक निशांत तिवारींनी सांगितले, 'बुधवारी मध्यरात्रीनंतर मंजुली आणि डुमरीया बाजार या गावांमध्ये शेकडोच्या संख्येने माओवादी एकत्र आले आणि त्यांनी खासगी मोबाईल कंपन्यांचे दोन टॉवर शक्तीशाली स्फोटकांनी उडवून दिले.'

पुढील स्लाइडमध्ये, 27 मार्चलाच स्फोट का?