आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maoists Consuming Special Food For Stamina, Spending Huge For Entertainment And Personal Grooming

\'पॉवर\' वाढवण्यासाठी नक्षली सेवन करतात स्पेशल फूड, मेकअपवरही आडमाप खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- आदिवासींच्या मुलभूत अधिकारांसाठी लढण्याचा दावा करणारे नक्षलवादी आता चैनीच्या वस्तुंवरही पैसा खर्च करत आहेत. एवढेच नव्हे तर ते आपल्या आरोग्याविषयी जागरूक असल्याचे दिसत आहे. शक्ति वाढवण्यासाठी नक्षलवादी विशेष पदार्थांचे सेवन करतर आहे. तसेच मेकअपवरही खर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात आमाबेडा भागात सुरक्षारक्षकांनी एका नक्षली शिबिरावर छापेमारीत केली. यात महत्त्वपूर्ण दस्ताऐवज सुरक्षारक्षकांच्या हाती लागले आहेत. नक्सली शिबिरांमध्ये इतके महागडे कॉस्मेटिक्स पोहोचवतच कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सुरक्षारक्षकांकडे नक्षवाद्यांच्या मासिक बजेटची यादी आहे. नक्षली शक्तिवर्धक पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती यातून समोर आली आहे. एवढेच नव्हे तर मेकअप, मनोरंजन आणि व्यसनावर पैसे उधळत आहेत.
अंडर-गारमेंट्स, स्वेटर, जॅकेट व कांबळीपासून साबण, तेल, शेव्हिग किट आणि ट्रांजिस्टरचा उल्लेख नक्षलवाद्यांच्या यादीत आहे. तसेच वीडी-माचिस, तंबाखू व गुटखाचाही समावेश आहे. नक्षली महागडे बिस्किट देखील खरेदी करतात. त्यामुळे नक्षलवाद्यांना महिन्याकाठी ठराविक रक्कम मिळत असावी. त्याआधारावर नक्षलवादी मासिक खर्चाचे बजेट आखत असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शस्त्रास्त्रांवरील खर्चाचा उल्लेख नाही
नक्षली शिबिर उधळून सुरक्षारक्षकांनी एका महिला नक्षलीला अटक केले आहे. याशिवाय नक्षलींच्या शिबिरात सापडलेल्या काही दस्ताऐवजमध्ये वर्दी, बूट, बंदूका आणि दारुगोळा खरेदी केल्याचा उल्लेख आहे. टिफिन बॉम्बमसाठी स्टीलचे डबे, फेव्हिकॉल आणि लागणारे इतर साहित्य खरेदी केल्याचे या दस्ताऐवजमध्ये नोंदवण्यात आले आहे. परंतु, नक्षली यावर किती किती खर्च केला आहे, याचा कुठेही उल्लेख आढळून आला नाही. नक्षलींपर्यंत एवढ्या मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा कुठून येतो, याचा आता पोलिस शोध घेत आहे.

हे देखील खरेदी करतात नक्सली...
नक्षली किराणा साहित्य, कॉस्मेटिक्स आणि इतर चैनीच्या वस्तुवर वेगवेगळा खर्च करतात. साखर, चहापावडर, दूध पावडर, भांडी याशिवाय रेशनचा देखील नक्षली हिशेब ठेवतात. आंघोळीसाठी ते ब्रॅंडेड साबण, तेल तसेच क्रीम वापरतात. मनोरंजनासाठी ट्रांजिस्टर आणि रेडिओ वापरतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नक्षली शिबिरावर केलेल्या छापेमारीत सुरक्षारक्षकांच्या हाती लागलेली यादी आणि वस्तूंचे फोटो