आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maoists Release Kidnapped Maharashtra Students Today

नक्षल्यांकडून पुण्याच्या अपहृत तरुणांची सुटका; 4 दिवसांपूर्वी झाले होते अपहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगदलपूर- पुण्यात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचे नक्षल्यांनी छत्तीसगडमध्ये अपहरण केले होते. त्यांना रविवारी सोडून दिले. आदर्श पाटील (कराड), विकास वाळके (पुणे) व श्रीकृष्ण शेवाळे (पाटण) अशी त्यांची नावे आहेत. ‘भारत जोडो अभियाना’अंतर्गत त्यांनी २० डिसेंबरपासून सायकल यात्रा सुरू केली होती. बिजापूर जिल्ह्यात बासागुडाजवळ ४ दिवसांपूर्वी त्यांना नक्षल्यांनी ताब्यात घेतले होते. रविवारी चिंतलनारमध्ये अाल्यानंतर आयजी एसआरपी कल्लुरी आणि बस्तरचे एसपी आर.एन. दाश हे त्यांना हेलिकॉप्टरने नेण्यासाठी आले. तेथून त्यांना संध्याकाळी जगदलपूर येथील विभागीय मुख्यालयात नेण्यात आले.

पुढील स्लाइडवर वाचा, आदर्शने सांगितली आपबीती...