आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Elizabeth Akadashi Director Paresh Mokashi Interview

‘एलिझाबेथ एकादशी’च्या विरोधात कसलाही ‘इश्यू’ नाही, दिग्दर्शक परेश मोकाशींचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला काही संघटनांनी विरोध केला आहे. हा चित्रपट गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवू नये, अशी भूमिका अनेक संघटनांनी घेतली अाहे. मात्र या महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’चे उद्‍घाटनच ‘एलिझाबेथ एकादशी’ने झाले. या सर्व पार्श्वभूमीवर, या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांची भूमिका, त्यांच्याच शब्दांत….

विरोधाला कारण नाही…
हेकसे होते ते तुम्हालाही चांगले माहित आहे. एखादे पत्र कोणीतरी देते. आमच्या भावना अशा अशा आहेत, असे त्यात सांगते. मग एकदा पेपरात आले की, या गोष्टीचा डायनासोर होतो. काही इश्यू नसतो. नसलेला इश्यू बनतो बऱ्याच वेळा. दोन्ही बाजूने थोडं संयमाने घ्यायला हवे. त्यात काही इश्यू नाही.

मराठीचा सुवर्णकाळ यायचाय
मराठीत सध्या इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी हिंदीच्या मानाने जास्त दिसते. मात्र, कलात्मक दृष्टीने मराठीचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे. आमच्यासारखी मंडळी काही प्रयोग करू पाहताहेत, परंतु माझ्या मनात समाधान नाही. अजूनही खूप काही व्हायला हवे. जरा नीट आपापल्या मतांना ठाम राहून एक चांगला चित्रपट करण्याचा आपण जास्त प्रयत्न केला पाहिजे. चित्रपट बोलपट राहता कामा नये.
समांतरचे प्रयोग सुरूच…
समांतर चित्रपट मागे पडल्याचे मला नाही वाटत. हिंदीतही असे प्रयत्न होतात, काहींना यशही मिळते. त्यामुळे ते व्यावसायिक चित्रपट आहेत असे वाटते. उदा. आज एलिझाबेथ एकादशीलाही व्यावसायिक यश मिळते आहे, मग त्याला त्या अर्थाने व्यावसायिक चित्रपट संबोधण्यात अर्थ नाही. तसे आहे हे. त्यामुळे चित्रपट हा चित्रपट म्हणून पाहावा. त्याचा व्यवसाय तुम्हाला कळणारच आहे ना, काय आहे ते.
स्थानिक कलाकार : चित्रपटातीलसर्व कलाकार पंढरपूर भागातले आहेत. ज्या प्रकारची फिल्म करतो त्यासाठी पोषक ठरते. टँलेंट सर्वत्रच आहे. मग वास्तवता आणण्यास वेगळे काही करण्याची गरज भासत नाही.

सुचली एकादशी : माझीपत्नी मधुगंधा मूळची पंढरपूरची आहे. तिच्या आठवणी ऐकताना ही चित्रपटाची कल्पना सुचली. लगेच संहिता केली कार्तिकी एकादशीला (२०१३) प्रत्यक्ष पंढरपुरात चित्रीकरण केले.
आगामी आकर्षण
पुढे आता एक दोन विषय डोक्यात आहेत. लिखाण चालू आहे. पुढच्या वर्षी नवा चित्रपट होईल. विषय आताच फोडायला सांगू नका, तुम्ही मला अडचणीतच टाकता राव. रहस्य राहू द्या की, आपल्या प्रेक्षकांसाठी.