आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी हताश होऊन करत होतो आकांत, ते उद्ध्‍वस्‍त करत होते बहिणीचे जीवन\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणी. - Divya Marathi
पीडित तरुणी.
बांदा - येथील एका घरात सुरू असलेल्‍या ब्यूटी पार्लरमध्‍ये रविवारी दुपारी तीन गुंड घुसले. त्‍यांनी घरातील युवकाला बेदम मारहाण करून डांबून ठेवले आणि त्‍याच्‍या ब्यूटीशियन बहिणीवर बलात्‍कार केला. त्‍यानंतर ते नराधम फरार झाले.
नेमके काय झाले...
> बांदा येथील नगर पोलिस ठाण्‍याअंतर्गत येणाऱ्या क्योटरामध्‍ये पीडित तरुणीचे घर आहे. घरातच ती ब्यूटी पार्लर चालवते.
> रविवारी दुपारी श्रीलाल नावाचा एक नाराधम आपल्‍या दोन मित्रांसह तिच्‍या पार्लरमध्‍ये घुसला. त्‍यांनी तिला जबरदस्‍ती पकडले.
> नंतर फरफटक दुसऱ्या माळ्यावर नेले. तिथे तिच्‍यावर बलात्‍कार केला.
> दरम्‍यान, आपल्‍या बहिणीचे ओरडणे ऐकून दुसऱ्या खोलीत असलेला तिचा भाऊ मदतीसाठी आला.
> मात्र, त्‍या तीन नराधमांनी त्‍याला बेदम मारहाण करत अन्‍य एका खोलीत डांबून ठेवले.
भाऊ- बहीण ओरडत होते, मदतीसाठी कुणीच आले नाही...
> आपल्‍याला मदत मिळावी, यासाठी दोघेही भाऊ-बहीण जीवाच्‍या अकांताने ओरडत होते.
> मात्र, त्‍यांच्‍या मदतीसाठी कुणीच आले नाही.

पोलिस काय म्‍हणाले ?
> या प्रकरणी पीडित भावा- बहिणी पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
> या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी माहिती पीआय के. पी. यांनी दिली.

पुढील स्लाइड्सवर पाहा पीडित तरुणीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)