आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तोंड काळे केले म्‍हणत बहिणीला मारली गोळी, लॉकेटमुळे वाचला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्‍तर प्रदेश) - घटस्‍फोटीत बहिणीने शेजाऱ्यासोबत संसार थाटला. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या भावाने तिच्‍यावर गोळी झाडली. तिने घट्ट डोळे मिटून घेत जिवाच्‍या आकांताने आरोळी ठोकली. मात्र, गळ्यात असलेल्‍या लॉकेटमुळे तिचे प्राण वाचले.
बहिणीले केले शेजाऱ्यासोबत लग्‍न…
> मेरठ येथील इंचौली परिसरातील शबनम (35) हिचा 10 वर्षांपूर्वी इरफान नावाच्‍या युवकासोबत विवाह झाला होता.
> 2 वर्षे संसार केल्‍यानंतर या दाम्‍पत्‍याने घटस्‍फोट घेतला.
> त्‍यानंतर शबनम ही आपल्‍या माहेरी इंचौलीमध्‍ये आली.
> या काळात तिचे शेजारी राहणाऱ्या अनीस कुरैशीसोबत सूत जुळले.
> काही दिवसांपूर्वी दोघांनी गुपचूप लग्‍न केले.
> या बाबत शबनमच्‍या कुटुंबीयांना माहिती मिळताच तिचा भाऊ नदीम संतप्‍त झाला.
पहिला निशाण चुकला, दुसरा लॉकेटवर लागला
> संतप्‍त झालेल्‍या नदीमने शबनमवर पहिल्‍यांदा गोळी झाडली. मात्र, निशाणा चुकला.
> त्‍या नंतर त्‍याने दुसरी गोळी चालवली.
> ती शबनमच्‍या गळ्यात असलेल्‍या लॉकेटवर आदळली.
> यात तिला जखम झाली.
> विशेष म्‍हणजे तिला हे लॉकेट अनीसने भेट दिलेले होते.
लोक आले मदतीला
> गोळी आणि शबनमचा आरोळी ऐकून आसपासचे लोक मदतीला धावले.
> लोक येताहेत हे पाहून शबनमचा भाऊ पळून गेला.
> या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर फोटोज…
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)