आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jat Mob Attempted To Kill Haryana Minister Captain Abhimanyu Family

VIDEO : आरोपीला अटक करण्‍यास गेलेल्‍या SIT टीमला बनवले बंधक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसआयटीच्‍या अधिकाऱ्यांना या खोलीत डांबून ठेवले. - Divya Marathi
एसआयटीच्‍या अधिकाऱ्यांना या खोलीत डांबून ठेवले.
रोहतक - हरियाणाच्‍या जाट आरक्षण आंदोलनादरम्‍यान आंदोलकांनी अर्थमंत्री कॅप्‍टन अभिमन्‍यू यांच्‍या बंगल्‍याला आग लावली होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्‍यास गेलेल्‍या एसआयटी टीमला लोकांनी एका खोलीत डांबून ठेवले. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्‍यामुळे तणाव निर्माण झाला आहे. SIT च्‍या अधिकाऱ्यांनी महिलांसोबत गैरव्‍यवहार केल्‍याचा आरोप संतप्‍त नागरिकांनी केला.
नेमके काय झाले...
> रोहतकच्‍या सेक्टर-14 मध्‍ये हरियाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्‍यू यांचा बंगला आहे. जाट आरक्षणाच्‍या दरम्‍यान 19 फेब्रुवारी रोजी काही आंदोलकांनी त्‍यांच्‍या बंगल्‍याला आग लावली.
> या प्रकरणातील आरोपी देवेंद्रला अटक करण्‍यासाठी एसआयटीचे पथक रोहतकच्‍या रैनकपुरा येथे आज (सोमवार) सकाळी 10.30 वाजता पोहोचले.
> परंतु, देवेंद्र फरार झाला.
> त्‍यानंतर एसआयटीच्‍या पथकाने देवेंद्रचा भाऊ रवींद्र याला ताब्‍यात घेतले. परिणामी परिसरातील नागरिक संतप्‍त झाले.
> त्‍यांनी एसआयटीच्‍या सदस्‍यांना एका खोलीत डांबून ठेवले.
> एसआयटीची टीम विना नंबरच्‍या गाडीतून आली आणि त्‍यांनी हकनाकक निरापराधांना त्रास दिला, शिवाय महिलांसोबत गैरव्‍यवहार केला, असा रोप संतप्‍त नागरिकांनी केला आहे.

शहरात तणाव

> या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
> अनुचित प्रकार टाळण्‍यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्‍त ठेवला आहे.
आग लावल्‍यानंतर वाटले होते लाडू
> मंत्र्याच्‍या घराला आग लावल्‍यानंतर आंदोलकांनी लाडू वाटले होते.
> नुकताच याचा एक व्‍ह‍िडिओ व्‍हायलर झाला.
> मंत्र्याचे कुटुंब जवळपास पावणे दोन तास आगीत फसले होते.
> या प्रकरणी पोलिसांनी अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीचा जिल्‍हाध्यक्ष दिलावर सिंह याला अटक केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO