आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टार्गेट अपूर्ण, बॉसने कर्मचाऱ्यांना छडीने झोडपले, VIRAL झाला व्‍हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - नॉर्दर्न चीनमधील शांग्झी येथील एका ग्रामीण व्यावसायिक बँकेच्‍या आठ कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या बॉसने त्‍यांना छडीने झोडपले. या प्रकाराचा व्‍ह‍िडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला असून, टीकेची झोड उठली आहे. दरम्‍यान, बँकेच्‍या अध्‍यक्षाला निलंबित करण्‍यात आल्‍याचे बँकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
कर्मचाऱ्यांना प्रत्‍येकी आठ छड्या...
> पीपल्स डेली न्यूजपेपरच्‍या वृत्‍तानुसार, हा अमानवी प्रकार बँकेच्‍या मीटिंगमध्‍ये घडला.
> व्‍हीडिओमध्‍ये 8 बँक कर्मचारी त्‍यांच्‍या गणवेशात व्‍यासपीठावर दिसत आहेत. काही लोक त्‍यांच्‍या समोर बसलेले आहेत.
> इतक्‍यात त्‍यांचा बॉस माइक घेऊन त्‍यांच्‍याजवळ जातो आणि त्‍यांच्‍या सुमार कामगिरीबद्दल जाब विचारतो.
> त्‍यांनंतर तो आठ जणांना प्रत्‍येकी चार छड्या मारतो.
> चौथ्‍या छडीचा अधिक मार लागल्‍याने एक महिला कर्मचारी वेदनेने विव्‍हळत असल्‍याचेही व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे.
चीनमध्‍ये यापूर्वीसुद्धा झाली अशी पिळवून
> चीनमध्‍ये असा प्रकार पहिल्‍यांदाच घडला असे नाही.
> ऑक्‍टोबर 2015 मध्‍ये एका कंपनीच्‍या विक्री प्रतिनिधीने टार्गेट पूर्ण केले नाही म्‍हणून सार्वजनिक ठिकाणी त्‍याला रांगायला लावले होते.
> 2013 मध्‍येसुद्धा एका कॉस्मेटिक्स कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांना बाजारपेठेत रांगायला लावले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, यापूर्वी कसे रांगायला लावले होते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...