आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिला अधिकाऱ्याने घेतला \'मिनिस्टर-माफिया\'शी पंगा, दिला राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू (कर्नाटक) - अल्‍पावधित 'लेडी सिंघम' म्‍हणून स्‍वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या कुडलिगी येथील डीएसपी अनुपमा शिनॉय यांनी आपल्‍या नोकरीचा राजीनामा दिला. त्‍यामुळे सोशल मीडियात त्‍या चर्चेत आल्‍या असून, त्‍यांनी राजीनामा मागे घ्‍यावा, अशी मागणी होत आहे. विशेष म्‍हणजे यापूर्वी त्‍यांनी कर्नाटकमधील कामगार मंत्री पी. टी. परमेश्वर नायक यांचा फोन होल्डवर ठेवला होता. त्‍या कारणाने त्‍यांची बदली झाली होती. त्‍यावेळीसुद्धा त्‍या चर्चेत आल्‍या होत्‍या.
अनुपमा यांनी दिला राजीनामा
> अनुपमा यांनी राजीनामा दिल्‍यानंतर आपल्‍या फेसबुक खात्‍यावर सोमवारी एक पोस्‍ट केली. त्‍याची देशभर चर्चा होत आहे.
> अनुपमा यांनी लिहिले, 'रिजाइंड अँड जॉबलेस'.
> आपल्‍या कार्यक्षेत्रातील अवैध दारू विक्री बंद व्‍हावी, यासाठी अनुपमा यांनी जीवतोड मेहनत घेतली होती.
> यासाठी त्‍यांनी सामान्‍य नागरिकांकडे मदतही मागितली होती.
> दारू माफियाच्‍या दबावामुळेच त्‍यांनी राजीनामा दिला, असे म्‍हटले जात आहे.
> यापूर्वी त्‍यांनी म्‍हटले होते की, आपण दारू माफियासमोर कधीच गुडघे टेकणार नाही. माझी नोकरी गेली तरी चालेल.
सिद्धारमैया यांचे 'रम राज्य'
> अनुपमा यांनी राजीनामा दिल्‍यानंतर फेसबुक पोस्‍टमधून कामगार मंत्री पी. टी. परमेश्वर नायक यांना आवाहन देत म्‍हटले, " मी तर राजीनामा दिला आहे. तुम्‍ही कधी देणार"?
> एवढेच नाही मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्‍या राज्‍य 'रम राज्य' असल्‍याची टीकासुद्धा त्‍यांनी केली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...