आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुट्यांत भारतात येणार होती तारिषी, आता येणार मृतदेह, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ संचित जैनसोबत तारिषी. - Divya Marathi
भाऊ संचित जैनसोबत तारिषी.
फिरोजाबाद - ढाका येथील हॉली आर्टीसियन बेकरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात फिरोजाबाद येथील 19 वर्षीय तारिषी जैन ही तरुणी मारली गेली. त्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. तारिषी रविवारी सुट्यांसाठी फिरोजाबादला येणार होती. मात्र, आता तिचा मृतदेहच येणार आहे.

कॅलिफोर्नियामध्ये अर्थशास्त्राची विद्यार्थिनी होती तारिषी
> तारिषी ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. ती कॅलिफोर्नियाच्या बेर्केले कॉलेजमध्ये एमबीए (अर्थशास्त्र) करत होती.
> ईस्टर्न बँक लिमिटेडने तिला आपल्या इंटरनशिप प्रोग्राम 2016 मध्ये सहभागी करून घेतले होते.
> त्या अनुषंगाने तिने ढाका येथे ईस्टर्न बँकेच्या प्रोजेक्ट 'ईबीएल - कॉमर्स ग्रोथ अपॉर्चुनिटी इन बांग्लादेश' मध्ये भाग घेतला होता.
> तारिषीच्या फेसबुक प्रोफाइलनुसार ती इंटरनेशनल स्टूडेंट्स असोसिएशन, बेर्केलेची सदस्य होती.
> तिने आपल्या एफबीवर मित्र आणि कुटुंबासह स्विट्जरलँड आणि तुर्कीमध्ये काही फोटो पोस्टे केलेले आहेत.
फिरोजाबादमध्ये होणार अंत्यसंस्कार
> सोमवारी दुपारी 1.30 वाजता तिचे पार्थिव दिल्लीला पोहोचणार आहे.
> त्या नंतर फिरोजाबाद येथे अंत्यसंस्कार केले जातील.
> तारिषीचे काका राकेश मोहन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका येथे जाण्यासाठी मंत्रालयाने आमच्या कुटुंबातील सहा जणांना व्हीसा दिला आहे.
तारिषिचे आई-वडील ढाक्यातच
> तारिषीचे वडील संजीव जैन, आई तुलिका जैन आणि भाऊ संचित जैन ढाक्क्यातच आहेत.
> ते सर्व तिचा मृतदेह घेऊन सोमवारी भारतात येणार आहेत.
काकाला गेला होता शेवटचा कॉल
परदेशात शिकणारी तारुशी जैन सुट्यांसाठी ढाक्यात गेली होती. तिच्या वडिलांचा तेथे कपड्यांचा व्यापार आहे. हल्ला झाल्यानंतर तारुशीने फिरोजाबादला तिचे काका राकेश मोहन यांना फोन केला. ‘हॅलो अंकल, मी इथे आले होते. अतिरेक्यांनी हल्ला केलाय. गोळीबार सुरू आहे. मी टॉयलेटमध्ये लपून बसले आहे...’ रात्री दीड वाजता हा शेवटचा फोन होता. यानंतर तिचा संपर्क तुटला...अतिरेक्यांनी तिलाही ठार मारले होते. ‘अतिरेक्यांनी तारुशीला ठार केले, हे सांगताना मला दु:ख होत आहे’, असे ट्विट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)