आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NSG मीटिंगमध्‍ये भारत नव्‍हता, अंदाजावरच क्रिया-प्रतिक्रिया, परराष्‍ट्र राज्‍य मंत्र्यांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया - 'अणू पुरवठादार गटाच्‍या (एनएसजी) सदस्‍य देशांची सेहूल येथे बैठक झाली. या बैठकीला भारत उपस्‍थि‍त नव्‍हता. त्‍यामुळे भारताला सदस्‍यत्‍व देण्‍याबाबत नेमकी काय चर्चा झाली कुणी विरोध केला, याची काहीही माहिती आमच्‍याकडे नाही', असा खुलासा खुद्द परराष्‍ट्र राज्‍य मंत्री व्‍ही. के. सिंग यांनी केला.
अंदाजावरच क्रिया-प्रतिक्रिया...
> बलिया येथे झालेल्‍या एका कार्यक्रमात सिंग बोलत होते.
> ते म्‍हणाले,''एनएसजीची बैठक एका बंद खेलीत होते. त्‍यामुळे त्‍यात काय चर्चा होत आहे, हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. ''
> '' त्‍यामुळे सध्‍या देशात जीही चर्चा सुरू आहे, त्‍यावर प्रतिक्रिया दिल्‍या जात आहेत हे सगळे केवळ अंदाजावरच आधारित आहे.''
> ''या बैठकीत कुणी कुणाला काय म्‍हणाले, याचा काहीही पुरावा नाही. या बैठकीला उपस्‍थ‍ित असलेल्‍यांनाच या बाबत काय ती माहिती आहे.''
> ''भारताच्‍या सदस्‍यत्‍वाला चीनने विरोध केला, याचासुद्धा काहीही पुरावा नाही. त्‍यामुळे मीडियामध्‍ये असे वृत्‍त येतेच कसे ? असा प्रश्‍नसुद्धा त्‍यांनी उपस्‍थित केला. ''
> ''या बाबत परराष्‍ट्र मंत्रालयानेसुद्धा अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.
भारतविरोधाला चीनला धरले होते जबाबदार
> सिंग यांच्‍या व्‍यक्‍तव्‍यापूर्वी परराष्‍ट्र मंत्रालयाने एनएसजीमध्‍ये भारताच्‍या प्रवेशाबाबत माहिती दिली होती.
> चीनच्‍या विरोधामुळे भारताला या गटाचे सदस्‍यत्‍व मिळाले नाही, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता विकास स्वरूप यांनी दिली होती.
> मात्र, आता सिंग यांच्‍या या व्‍यक्‍तव्‍यामुळे परराष्‍ट्र मंत्रालयात समन्‍वयाचा अभाव असल्‍याचे दिसून येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...