आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत समजून घेण्यासाठी जर्मनीची युवती बेंगळुरूमध्ये विकतेय आलूचाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - जर्मनीची ३२ वर्षीय लॉरा क्लाट पेशाने रंगमंच कलाकार आहे. लोकांना भेटणे, त्यांच्या चाली-रीती समजून, जाणून घेण्याची तिला प्रचंड आवड आहे. काही महिन्यांपूर्वी ती बंगळुरूमध्ये आली होती. तेथे ती जवळपास आठवडाभर राहिली. मात्र लोकांना भेटू शकली नाही की शहरही समजून घेऊ शकली नव्हती.लॉरा भारतातून जर्मनीला परत गेली, मात्र तिला काही चांगले वाटले नाही. भारतामध्ये काही तरी अर्धवट सोडून आपण जर्मनीला आलोत, अशी तिला हुरहुर वाटू लागली. त्यामुळे तिने पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. या वेळी ती तब्बल सात आठवडे भारतात राहणार आहे. लोकांना भेटण्यासाठी तिने आगळावेगळा फंडा अवलंबला आहे. सायकलवर जर्मनीची प्रसिद्ध आलूचाट बंगळुरूच्या गल्ल्यागल्ल्यातील लोकांना ती खाऊ घालत आहे. त्या बदल्यात ती फक्त पाच रुपये घेते. शिवाय कुणी काहीही देऊन तिच्याकडची आलूचाट घेऊ शकतो.

लॉरा पहिल्यांदा एका रेसिडेन्सी कार्यक्रमानिमित्त बंगळुरूला आली होती. जर्मन कलाकारांसाठी एका संस्थेने त्याचे आयोजन केले होते. या वेळीही लॉरा आपल्या थिएटर कलाकार मित्रांसोबत भारतात आली आहे. लॉरा म्हणते, ‘ भारतात लोक स्ट्रीट फूडचे वेडे आहेत.त्यामुळे जर्मनीची प्रसिद्ध आलूचाट खाऊ घालण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्याबदल्यात येथील लोक मला खूप काही देत आहेत. बाजारात गेले तर महिला आलूचाट खाण्यासाठी भाज्या आणि फुले देतात. हे खूपच गमतीदार आहे. काही लोक स्थानिक कथा ऐकवतात. माझा एक मित्र स्थानिक भाषा समजून घ्यायला मला मदत करतो. मला काहीच कळत नाही, असे जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा तो मला समजावून सांगतो. तो प्रत्येक वेळी माझ्यासोबत राहू शकत नाही.त्यामुळे लोकांच्या हावभावावरून मी त्यांचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करते. तसेही माझ्यासाठी भाषेपेक्षा लोकांना भेटणे, त्यांना जाणून घेणे आणि शहर समजून घेणे महत्त्वाचे आहे. चाट विकत विकतच मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करते. येथील लोक मनमिळाऊ आहेत. ते प्रचंड उत्साहाने माझे स्वागत करतात. शहर स्वच्छ व सुंदर आहे. आणखी दोन आठवडे येथे आहे. मला काही दिवसांसाठी येथे रेस्टॉरंट चालवण्याची इच्छा आहे. काही दिवसांनंतर मी बर्लिनला जाईन. मात्र पुन्हा एकदा भारतात अवश्य येईन’.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, लॉरा क्लाटचे फोटोज....