लखनौ ( उत्तर प्रदेश) - येथील एका 28 वर्षीय तरुणीवर तिला जन्म देणाऱ्या बापाने आणि पाठीराख्या भावाने सलग नऊ वर्षे बलात्कार केला. या काळात तिच्या आईने तब्बल आठ वेळा गर्भपात करायला लावला. ही आपबिती सांगताना ती आजही धायमोकलून रडते. 6 सप्टेंबर 2013 रोजी या नरक यातनेतून तिची सुटका झाली. हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही, असे ती सांगते.
अंधश्रद्धेतून झाली सुरुवात
- ही घटना लखनौ शहरातील आलमबाग पोलिस ठाण्याअंतर्गत घडली.
- येथे 18 जुलै 1988 रोजी जन्मलेल्या एका मुलीचे बालपण आजोळी गेले. अधून - मधून ती आपल्या आई वडिलांकडे येत होती. तेव्हा तिचे लाडही होत होते.
- वडिलांनी नवीन घर बांधल्यानंतर ती 2004 मध्ये आई वडिलांकडे राहायला आली.
- याच वेळी तिच्या वडलांची तब्येत खूप खालावली.
- अंधश्रद्धाळू असलेल्या तिच्या आईवडिलांनी एखाद्या डॉक्टराला दाखवण्याऐवजी एका मांत्रिकाचा सल्ला घेतला.
- मांत्रिकाने सांगितले, बापावर पोरीची काळीछाया पडली आहे.
- त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी वडील आणि मुलीचे शरीर संबंध येणे आवश्यक आहे, असा अघोरी सल्ला त्याने दिला.
- त्या नंतर मी खूप रडले. पण, माझ्या आईने माझा विरोध झुगारून मला असे करणे भाग पाडले.
- त्या नंतर असे वारंवार व्हायला लागले.
भावाला सांगितले तर तोही तसाच निघाला ...
- पीडित तरुणीने सांगितले, या काळात माझा भाऊ शिक्षणासाठी शहराबाहेर होता.
- तो घरी आला असता मी त्याला माझ्यासोबत काय होत आहे हे सांगितले.
- त्यावर त्याने माझे रक्षण करण्याऐवजी तोही वडिलांप्रमाणेच रेप करायला लागला.
- ज्या दिवशी मी वडील किंवा भावासोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार देत असे त्या दिवशी आई मला मारहाण करत होती.
- 9 वर्षांपर्यंत (3 हजार दिवस) भाऊ आणि वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला.
- या काळात 8 वेळा मला गर्भधारणा झाली होती.
अशी झाली सुटका
- 6 सप्टेंबर 2013 रोजी मी बेरोजगारी भत्त्याचा फॉर्म भरण्याचे निमित्त करून घराबाहेर पडले. थेट अखिलेश यादव यांच्या जनता दरबार गेले.
- मुख्यमंत्र्यांना माझ्यावरील अत्याचाराबाबत सांगितले. त्यांनी त्याची दखल घेत तत्काळ एसओ शिवा शुक्ला यांना तपासाचे आदेश दिले.
- त्यानंतर आई, वडील आणि भावाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. ते सध्या जेलमध्ये आहेत.
- यूपी सरकारने राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने मला सन्मानित केले.
- नवी आशा नावाच्या एका सामाजिक संस्थेने माझा भार उचलला.
- या संस्थेच्या माध्यमातूनच मी ब्यूटिशियनचा कोर्स केला.
- महिला सम्मान प्रकोष्ठने ब्यूटी पार्लरही सुरू करून दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आरोपी बाप- भावाचे फोटोज...