आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG ! क्रब खोदून बाहेर काढत होते मृतदेह, मुंडके कापून नेत होते सोबत, चोघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेगूं (राजस्थान) - येथील स्‍मशानभूमित दफन केलेले मृतदेह उकरून त्‍यांचे मुंडके कापून नेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. दरम्‍यान, त्‍यांचे तीन साथीदार फरार झाले. फरार झालेल्‍यामध्‍ये दोन तांत्रिक असून, ते मानवी कवट्यांची विक्री करत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.
करत होते कवट्यांची तस्‍करी...
> एसएचओ भवानीसिंह राजावत यांनी सांगितले, शहरात कुणाचे निधन झाले आणि त्‍या व्‍यक्‍तीचा मृतदेह दफन केला तर काहीच दिवसांत त्‍याची क्रब उकरून मृतदेहाचे डोके कापून नेण्‍याच्‍या घटना वाढल्‍या होत्‍या.
> त्‍या अनुषंगाने आम्‍ही सापळा रचून राजकुमार ऊर्फ राजू सेन, काशीराम गुर्जर, ओंकार भील आणि काशीराम भील यांना अटक केली.
> 11 मे आणि 1 जून रोजी अशा प्रकारे मृतदेहाचे डोके कापून नेल्‍याची कबुली त्‍यांनी दिली.
> स्‍वत:ला तांत्रिक म्‍हणून घेणारे युनूस आणि लक्ष्मण जाट या दोघांनी बालू याला पैशांचे अमीष देऊन मृतदेहाच्‍या कवट्या आणण्‍याचे काम दिले होते.
> बालू हा प्यारा भील, पप्पू भील, शिवलाल कंजर आणि राजकुमार सेन यांना पैसे देऊन त्‍यांच्‍याकडून हे काम करून घेत असे. हे चौघेही मजुरी करतात.
> यातील चौघांना पोलिसांनी अटक केली तर युनूस, लक्ष्मण जाट आणि शिवलाल कंजर फरार आहेत.
> या प्रकरणी मेहबूब अली आणि कब्रिस्तान समितीचे अध्यक्षांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
लक्ष्मण आणि यूनुस कुणाला विकत मानवी कवट्या ?
लक्ष्मण आणि यूनुस हे दोन तांत्रिक या कवट्या इतर तांत्रिकांना विकत. त्‍यामुळे मानवी मृतदेहाची विटंबना करणारे रॅकेट राज्‍यभर असल्‍याचा पोलिसांना संशय आहे. त्‍यांच्‍यासाठी जे मजूर खोदकाम करत त्‍यांना या बाबत फार काही माहिती नाही. त्‍यामुळे लक्ष्‍मण आणि युनुसच्‍या अटकेनंतरच अधिक माहिती मिळणार आहे.
एक डोके केले जप्‍त
पकडलेल्‍या आरोपींकडून एका मृतदेहाचे मुंडकेसुद्धा जप्‍त करण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नागरिकांनी केले होते आंदोलन ...
बातम्या आणखी आहेत...