आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटांचा पाऊस : उत्तराखंडमध्‍ये 900 गावांत वीज गुल, महाराष्‍ट्रातही जोर वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोध्रा परिसरात पुरामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले. - Divya Marathi
गोध्रा परिसरात पुरामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले.
नवी दिल्‍ली - देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबणे हे चित्र तर सार्वत्रिक आहेच. पण, उत्‍तराखंडमध्‍ये पावसामुळे तब्‍बल 900 गावांतील वीज पुरवठा खंडित झाला. डोंगरी भागात 5 दिवसांपासून संततधार सुरू आहे. मध्य प्रदेश, उत्‍तर प्रदेश, गुजरात, राजस्‍थान आणि महाराष्‍ट्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
उत्तराखंडमध्‍ये अनेक रस्‍ते बंद, भाविक अडकले
> उत्तराखंड पॉवर कार्पोरेशन लिमिटेडच्‍या (UPCL) एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने सांगितले, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे पोल कोलमडले आहेत. शिवाय वीज वाहन्‍या तुटल्‍या आहेत. त्‍यांच्‍या दुरुस्‍तीचे काम सुरू आहे.
> चमौली जिल्‍ह्यातील 137, पिथॉरागडचे 466 आणि टेहरीच्‍या 317 गावांचा वीज पुरवठा मागील 24 तासांपासून खंडित आहे.
> पिथॉरागडच्‍या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पवन सिंग यांनी सांगितले, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्‍याने रस्‍ते बंद झालेत. त्‍यामुळे बाहेर राज्‍यातील हजारो भाविक येथे अडकून पडलेत.
> आतापर्यंत 35 जणांचा मृत्‍यू झाला.
येथेही जोरदार पाऊस
> यूपीच्‍या मिर्जापूरमध्‍ये गुजरातच्‍या गोधरा येथे आणि मध्‍यप्रदेशातील बहुतांश जिल्‍ह्यातील जोरदार पाऊस होत आहे.
> राजस्‍थानातीलही अनेक भागांत पावसाचा जोर वाढला.
महाराष्‍ट्रातही अनेक भागांत पाऊस
महाराष्‍ट्रातही मागील 24 तासांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. त्‍यामुळे नद्या- नाल्‍यांना पूर आला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....