आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान प्रशिक्षणासाठी स्वदेशी \'एचटीटी-40\'; सैन्‍य दल करणार वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- वैमानिकांना प्राथमिक प्रशिक्षण देण्यासाठी निर्मित स्वदेशी बनावटीचे एचटीटी-४० हे विमान शुक्रवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत आकाशात झेपावले. दोन प्रवासी क्षमता असलेल्या या विमानाची बांधणी विमान हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने केली आहे.
ग्रुप कॅप्टन सी. सुब्रमण्यम वेणुगोपाल यांनी १० ते १५ मिनिटे या विमानाची चाचणी घेतली. लष्कराच्या तिन्ही दलांतील प्रशिक्षणार्थींना प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण देण्यासाठी ही विमाने वापरली जाणार आहेत. भारतीय हवाई दलास प्रशिक्षणासाठी अशी ७० विमाने लवकरच पुरवली जाणार आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या यशाबद्दल हवाई दल हिंदुस्थान एरॉनॉटिक्सच्या तज्ज्ञांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे या विमानाची बांधणी करणाऱ्या पथकातील सदस्य तरुण असून त्यांचे सरासरी वय अवघे २९ वर्षांचे आहे. या विमानांचा हवाई दलास पुरवठा केला जाणार असला तरी काही प्रमाणात या विमानांची निर्यातदेखील करण्यात येणार आहे.

स्वदेशी बनावटीचे एचटीटी-४० हे विमान शुक्रवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झेपावले.

पुढील स्लाइड्सवर संबंधित फोटोज...