आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंशुमनच्या पाणबुडीवर अमेरिका भाळली, भारतीय अभियंत्यांनी पटकावला दुसरा क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया - गयेतील अंशुमनच्या नेतृत्वाखाली इंडियन इन्स्टिट्युट अाॅफ टेक्नाॅलाॅजी बाॅम्बेच्या चमूने बनवलेल्या पाणबुडीवर अमेरिका भाळली. अमेरिकेतील सॅनदिएगाे शहरात राेबाेसब स्पर्धा झाली. यामध्ये भारतासह ११ देशांचे स्पर्धक सहभागी झाले हाेते. विशेषत: अमेरिकेसह, कॅनडा, जपान, चीन, रशियाचे अभियंतेदेखील सहभागी हाेते.

स्पर्धकांना पाणबुडी बनवण्याचे सांगण्यात अालेे हाेते. ही पाणबुडी सागरी वातावरणात विविध रंगांचे फुगे अाेळखून त्यास स्पर्श करेल तसेच काही साहित्य एका ठिकाणाहून अन्य ठिकाणावर वाहून नेऊ शकेल अाणि यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे छिद्रांची अाेळख पटवून मिसाईल सारख्या वस्तूंचा त्यात भरणा करेल अाणि विविध अावाज अाेळखू शकेल अशा काही अटीदेखील ठेवण्यात अाल्या हाेत्या. भारतीय चमूने बनवलेली ‘मत्स्या’ ही पाणबुडी या साऱ्या अपेक्षांवर खरी उतरली. इतकेच नव्हे, तर अंशुमनच्या नेतृत्वाखालील ७ अभियंत्यांच्या टीमने दुसरा क्रमांक पटकावला.
अंशुमनचे वडील चालवतात पानपट्टी
इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ बाॅम्बेचा विद्यार्थी अंशुमन कुमार याचे वडील सुनील कुमार गया येथे पानपट्टी चालवतात, तर त्याची अाई गृहिणी अाहे. अापल्या मुलाच्या या यशाविषयी प्रतिक्रिया देताना वडील सुनील कुमार म्हणाले, अंशुमन लहानपणापासूनच हुशार अाहे. अंशुमनचा माेठा भाऊदेखील इंजिनिअर अाहे.
बातम्या आणखी आहेत...