आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधी होत्‍या केवळ 17 वर्षांच्‍या, फिरोज यांनी केले होते प्रपोज, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद (उत्‍तर प्रदेश) - होऊ घातलेल्‍या उत्‍तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्‍यासाठी येथे भाजपच्‍या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या शहराशी नेहरू कुटुंबाचेही ऋणाणुबंध आहेत. त्‍याचीच माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
अशी झाली पहिली भेट
> फिरोज यांचे वडील जहांगीर घांडी यांचे 1920 मध्‍ये निधन झाले. त्‍यानंतर त्‍यांची आई त्‍यांना इलाहाबादला घेऊन आली.
> त्‍या ळात इंदिरा नेहरू या आपल्‍या कुटुंबीयासोबत इलाहाबादला राहत होत्‍या.
> दोघेही स्‍वातंत्र चळवळीत कार्यकत होते.
> इंदिरा नेहरू यांनी वानर सेना बनवून स्‍वातंत्र चळवळीत भाग घेतला होता.
> त्‍यांच्‍या पहिल्‍या भेटीच्‍या वेळी इंदिरा यांच्‍या आई कमला नेहरूसुद्धा उपस्‍थ‍ित होत्‍या.
> खूप उन्‍हात वानर सेनेची सभा सुरू होती. उष्‍माघातानाने कमला या बेशुद्ध झाल्‍या. त्‍यावेळी फिरोज यांना तत्‍काळ त्‍यांना सावरले. ही घटना 1930 ची आहे. याच ठिकाणी इंदिरा आणि फिरोज यांची पहिली भेट झाली.
> तिथून त्‍यांच्‍यात मैत्री वाढत गेली.

17 वर्षांच्‍या इंदिरा यांना फिरोज यांनी केले होते प्रपोज...
> पुढे नेहरूंना टीबी झाल्यानंतर त्यांच्यावर भुवाली येथील टीबी सॅनिटोरियम येथे उपचार करण्यात आले.
> तेव्हा फिरोज त्यांच्यासोबत राहिले होते. जेव्हा उपचारासाठी त्या यूरोपात गेल्या तेव्हाही फिरोज त्यांना भेटण्यासाठी गेले होते.
> 1936 मध्ये जेव्हा कमला नेहरुंचे निधन झाले तेव्हा फिरोज गांधी तिथे उपस्थित होते. कदाचित यामुळेच इंदिरांच्या मनाच्या कोपऱ्यात फिरोज यांना स्थान मिळाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
> या विवाहाला इंदिरांचे वडील जवाहरलाल नेहरु तयार नव्हते. मात्र, वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन इंदिरांनी मार्च 1942 मध्ये फिरोज यांच्यासोबत लग्न केले.
> या लग्नात इंदिरांना मिळालेली सर्वात मोठी भेट म्हणजे महात्मा गांधींनी त्यांचे आडनाव इंदिरा आणि फिरोज यांना दिले. कालांतराने पंडित नेहरुंनीही हे नाते स्वीकारले आणि या लग्नाला मान्यता दिली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटोज..
बातम्या आणखी आहेत...