आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाका : इसिसने नव्‍हे तर \'जमायतुल मुजाहिदीन\' संघटनेने केला हल्‍ला, गृहमंत्र्याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका : येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी स्थानिक मुस्लिम दहशतवादी आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच जबाबदार आहे, असा ठपका बांगलादेशने ठेवला आहे. या हल्ल्यात इसिस या दहशतवादी संघटनेची भूमिका असल्याची शक्यता सरकारने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले की, बांगलादेशात इसिस किंवा अल-कैदा या दहशतवादी संघटनांचे अस्तित्व नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. स्थानिक दहशतवादीच ओलीस नाट्यातील सूत्रधार आहेत. ते इसिस अथवा इतर आंतरराष्ट्रीय मुस्लिम संघटनांचे सदस्य नाहीत. हे स्थानिक दहशतवादी जमातुल मुजाहिदीन बांगलादेश या संघटनेशी संबंधित आहेत.

ढाक्यातील ओलीस नाट्य आणि दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली होती. या हल्ल्यात २० जण ठार झाले होते. त्यापैकी बहुतांश जण विदेशी नागरिक होते. हल्ल्यात २ पोलिस अधिकारीही ठार झाले होते.

दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढू : हसीना
ढाका हल्ल्यातील दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढू, असा निर्धार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केला. जपानचे परराष्ट्रमंत्री सैजी किहारा यांनी रविवारी हसीना यांची भेट घेतली त्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
जमायतुल मुजाहिदीन इसिसशी संबंध नाही
> जमायतुल मुजाहिदीन ही बंगलादेशी दहशतवादी संघटना आहे.
> तिथे या संघटनेवर बंदी आहे.
> इस्लामिक स्टेटशी (इसिस) या संघटनेशी तिचा काहीही संबंध नाही, अशी माहितीसुद्धा खान यांनी दिली.

नेमका कसा झाला होता हल्‍ला ?
> शुक्रवारी रात्री 9.20 वाजताच्या सुमारास नऊ दहशतवादी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत गुलशन परिसरातील हॉटेल आर्टिझन बेकरीमध्ये घुसले.
> त्यानंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी 20 परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते.
> लष्करी अभियान महासंचालक ब्रिगेडियर जनरल नईम अशफाक चौधरी यांनी सांगितले की, सशस्त्र दलांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई सुरू होण्याच्या आधीच दहशतवाद्यांनी 20 ओलिसांची निर्दयीपणे हत्या केली.
> हत्या झालेल्या नागरिकांचे गळे कापण्यात आले आहेत. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या तारुशी या 18 वर्षीय भारतीय तरुणीचीही हत्या केली.
> या हल्ल्यात 30 जण जखमी झाले आहेत.पंतप्रधान शेख हसीना यांनी हे ओलीस नाट्य संपुष्टात आणण्यासाठी लष्कराला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिल्यानंतर ऑपरेशन थंडरबोल्ट हाती घेण्यात आले होते.
बांगलादेशींवर दया, रात्रीचे जेवणही दिले
दहशतवाद्यांनी ओलिसांचा धर्म ओळखण्यासाठी त्यांना कुराणातील आयती ऐकवण्याचे फर्मान सोडले. ज्यांनी त्या म्हटल्या त्यांच्यावर दया दाखवली. ज्यांना त्या ऐकवता आल्या नाहीत त्यांचा अनन्वित छळ करून ठार मारले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हसनत करीम, त्यांची पत्नी शर्मिन 13 वर्षांची सफा वर्षीय रायनसोबत सफाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल आर्टिझनमध्ये गेले होते. दहशतवाद्यांनी बांगलादेशींशी दुर्व्यवहार केला नाही. उलट त्यांना रात्रीचे जेवणही दिले, असे हसनतचे वडील रेझौला करीम यांनी सांगितले. या कुटुंबासह 13 ओलिसांची बांगलादेशी कमांडोंनी सुटका केली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...