आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींसह कॉंग्रेसच्‍या 4 नेत्‍यांविरुद्ध FIR, कंस्ट्रक्शन कंपनीचे देणे थकवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम (केरळ) - कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि केरळचे माजी मुख्‍यमंत्री ओमान चांडी यांच्‍यासह चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला. केरळमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीचे 2.8 कोटी रुपये थकवल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे.

नेमके काय आहे प्रकरण...
> या इमारतीच्‍या बांधकामाचा कंत्राट केरळ कॉंग्रेस समितीने हॅथर कंस्ट्रक्शन प्राइव्‍हेट लिमिटेड कंपनीला दिला होता.
> कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राजीव यांनी सांगितले, 2005 मध्‍ये हे काम पूर्ण झाले. परंतु, त्‍यानंतर आजपर्यंत आम्‍हाला या कामाचा मोबदला मिळाला नाही.
> त्‍यामुळे आम्‍ही यापूर्वी अखिल भारतीय कॉंग्रेस अध्‍यक्षांच्‍या नावे कायदेशीर नोटिस पाठवली होती.
> काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे आम्‍ही तक्रार दिली आहे.
> ऑक्‍टोबर 2005 मध्‍ये या इंस्टिट्यूटच्‍या कार्यक्रमाला सोनिया गांधी आल्‍या होत्‍या.
केरळ कॉंग्रेसने म्‍हटले- आमच्‍याकडे पैसे नाहीत
> काही वर्षांपासून केवळ कॉंग्रेसमध्‍ये गटबाजी उफाळली आहे. त्‍यामुळेच कंस्ट्रक्शन कंपनीचे देणे देण्‍यास उशीर लागत आहे.
> सोनिया गांधी यांना या प्रकरणी नोटीस मिळाल्‍यानंतर त्‍यांनी केरळ कॉंग्रस समितीला थकित मोबदला देण्‍याचे आदेश दिले होते.
> परंतु, पैसेच नसल्‍याचे कारण देत देत केरळ कॉंग्रेसने मोबदला देण्‍याचे टाळले.
> त्‍यामुळे कंपनीने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे सोनिया आणि चांडी यांच्‍यासह इंस्टीट्यूटचे अध्‍यक्ष रमेश चैन्निथला, आणि केरळ कॉंग्रेस समितीचे अध्‍यक्ष व्‍ही . एम. सुधीरन यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, वादग्रस्‍त इमारत....
बातम्या आणखी आहेत...