आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षीय मुलीची बोली, खरेदीसाठी आले 8 नवरदेव आणि 60 वऱ्हाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुंझुनूं - राजस्थानातील झुंझुनूंमध्‍ये आई-वडिलांनीच आपल्‍या पोटच्‍या 13 वर्षीय मुलीची एका दलालामार्फत मंगळवारी सायंकाळी बोली लावली. तिच्‍या खरेदीसाठी 8 नवरदेव आणि 60 वऱ्हाडी आले होते. 30 हजाराच्‍या बोलीपासून हा लिलाव सुरू झाला होता. पोलिस घटनास्‍थळावर येताच सर्वांनी पळ काढला.
पीडित मुलगी आहे तिचे कुटुंब बिहारचे
> पोलिसांनी सांगितले की, झुंझुनूं शहरातील एका रोडवेज डेपो जवळ एका अल्‍पवयीन मुलीचा लिलाव होत असल्‍याची गुप्‍त माहिती पोलिसांना मिळाली होती.
> पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब बिहारचे रहिवासी आहेत.
> तिच्‍या आई-वडिलांनीच एका एजंटमार्फत तिला विक्रीसाठी आणले होते.
> लिलाव अंतिम टप्‍प्‍यात आला. पण, घटनास्‍थळावर पोलिस येताच सर्वांनी पळ काढला.
> पाठलाग करून काही जणांना पोलिसांनी पकडले; परंतु त्‍यांची चौकशी करून त्‍यांना सोडून देण्‍यात आले.
आई वडिलांनी केली दीड लाखांची मागणी
> बसने हे बिहारी कुटुंब आपल्‍या मुलीला घेऊन येथे आले.
> बस स्‍टँटच्‍या जवळच मुलीचा लिलाव सुरू झाला.
> आठ उपवर मुलांच्‍या कुटुंबीयांनी 30 हजारांपासून बोलीला सुरुवात केली.
> ही बोली 80 हजारापर्यंत पोहोचली.
> मात्र, मुलीच्‍या आई-वडिलांना दीड लाख रुपयेच हवे होते.
खरेदी करण्‍यास आले 30 ते 38 वयोगटातील पुरुष
> या 13 वर्षांच्‍या मुलीच्‍या खरेदीसाठी 30 ते 38 वर्षांचे पुरुष खरेदीसाठी आले होते.
> पोलिस येताच तिच्‍यासह आई- वडिलांनी घटनास्‍थळावरून पळ काढला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...