आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासाठी केला NRI पतीचा खून, समोर होता मृतदेह, ती करत होती व्‍हिडिओ शूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहजहांपूर - इंग्‍लडवरून भारतात सुट्या घालवण्‍यासाठी आलेल्‍या एका महिलेने आपल्‍या प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून केला. त्‍यानंतर तिचा प्रियकर दुबईला पळून जाण्‍याच्‍या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्‍याला विमानतळावर अटक केली.
काय आहे प्रकरण...
- मूळ भारतीय असलेली आणि आता इंग्‍लडचे नागरिकत्‍व घेतलेली रमनदीप कौर ही तिचा पती सुखजीत सिंह आणि दोन चिमुकल्‍यांसह भारतात सासरी आली होती.
- दरम्‍यान, पतीचा बालपणीचा मित्र असलेल्‍या गुरूप्रीत सोबत तिचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते.
- गुरूप्रीत हा दुबईत स्‍थायिक झालेला आहे. याच काळात तोही भारतात आला.
- गुरूप्रीत आणि रमनदीप यांनी मिळून सुखजीतचा खून केला.
पोलिसांना असा आला संशय
- सुरुवातीला रमनदीपने पोलिसांची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला.
- पोलिस पंचनामा करण्‍यास घरी आले होते. त्‍यावेळी रमनदीपच्‍या पत्‍नीचा मृतदेह रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेला होता. असे असताना ती पोलिसांसमोर त्‍याचा व्‍ह‍िडिओ शूट करत होती.
- तिच्‍या चेहऱ्यावर काहीच दु:ख दिसत नव्‍हते.
- त्‍यामुळे पोलिसांना संशय आला. त्‍यांनी तिची चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.
दुबईला होणारी होती स्‍थायिक
खून केल्‍यानंतर रमनदीप आणि तिचा प्रियकर दुबईला पळून जाऊन तिथेच स्‍थायिक होणार होते. मात्र, त्‍यापूर्वीच त्‍यांच्‍या कृत्‍याचा भांडाफोड झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...