आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्‍टेलमध्‍ये घेत होता फाशी, 5 मिनीट उशीर झाला असता तर जगात नसता, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - येथील कला महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीशकुमार याने सोमवारी आपल्‍या हॉस्‍टेलमध्‍ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. दरम्‍यान, साफ सफाई करणाऱ्या महिलेने हा प्रकार पाहिला. तिने मोठ्याने आरोळी ठोकली. त्‍यामुळे इतर विद्यार्थ्‍यांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत नितीशला खाली उतरवले. त्‍यांना पाच मिनिटसुद्धा उशीर झाला असता तर नितीश या जगात नसता.
इतर मित्र करत होते आंदोलन, नितीश होता एकटा
हॉस्‍टेलमधील 3 नंबरच्‍या खोलीमध्‍ये नितीशकुमार एकटा होता. यावेळी त्‍याचे इतर मित्र कॉलेज प्रशासनाविरुद्ध आंदोलन करत होते. नितीनने पंख्‍याला दोर अडकवून गळफास घेण्‍याचा प्रयत्‍न केला. यात त्‍याच्‍या गळ्याची एक नस दबली. त्‍याच्‍या इतर मित्रांनी त्‍याला तत्‍काळ रुग्‍णालयात रुग्‍णालयात भरती केले.
नेमके काय आहे प्रकरण...
नितीश हा मागासलेल्‍या जातीचा आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍यासह त्‍याच्‍या इतर मित्रांना कॉलेजचे प्राचार्य चंद्रभूषण श्रीवास्तव नेहमीच जातीवरून बोलतात. शिवाय आरक्षणामुळे तुम्‍ही येथे आलात, असे टोमणेसुद्धा मारतात, असा आरोप विद्यार्थ्‍यांनी केला. त्‍या विरुद्धच ते आंदोलन करत होते. या छळाला कंटाळून नितीशने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला.
दिला होता आत्‍मदहनाचा इशारा
नितीश बीएफएच्‍या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून, तो गया जिल्‍ह्यातील रहिवासी आहे. प्राचार्याला निलंबित करावे, अशी मागणी तो एक महिन्‍यापासून करत होता. एवढेच नाही तर त्‍याने आत्‍मदहन करण्‍याचा इशारासुद्धा दिला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO....
फोटो- शबिना
बातम्या आणखी आहेत...