रांची - एकच साडी 125 पद्धतीने कशी नेसावी, हे मागील 12 वर्षांपासून सेलिब्रेटींना शिकवणारी डॉली जैन एका कार्यक्रमानिमित्त जमशेदपूरमध्ये आली होती. यावेळी तिने आमची सहयोगी वेबसाइट dainikbhaskar.com सोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. डॉलीने सांगितले, तिने आतापर्यंत युक्ता मुखी, प्रियंका चोपडा, हेमा मालिनी, लारा दत्ता, दिया मिर्झा, रविना टंडन, दीपिका पादुकोण यासह इतर अनेक सेलिब्रेटिंना साडी कशी नेसावी हे शिकवले.
लिम्का बुकात नोंद...
> डॉली ही मूळची बेंगळुरू येथील रहिवासी आहे. तिथेच तिचे शिक्षण झाले. डॉलीच्या नावावर लिम्का बुकात सर्वात वेगवान साडी नेसण्याचा विक्रम आहे. तिने केवळ 18.5 सेकेंदात साडी नेसली होती.
> तिने साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या. हीप-होल, मत्स्य टोली, मुमताजी हे प्रकार तिनेच शोधून काढले.
या व्यवसायायची अशी सुचली कल्पना
> डॉलीने सांगितले, लग्नानंतर जेव्हा ती सासरी गेली तेव्हा तिला साडी नेसणे बंधनकारक करण्यात केले.
> मात्र, कायम वेस्टर्न ड्रेस घालणाऱ्या डॉलीला साडी नेसता येत नव्हते.
> त्यामुळे आरशासमोर तासन् तास उभी राहून तिने साडी नेसण्याची प्रॅक्टीस केली.
> यातूनच तिला वेगवेगळ्या कल्पना सुचल्या.
असे मिळाली सेलेब्ससोबत काम करण्याची संधी
> लिम्का बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉलीच्या नावाची नोंदणी झाल्यानंतर अनेक डिजाइनर्सने तिच्यासोबत संपर्क केला.
> सर्वात अगोदर तिने श्रीदेवीसोबत काम केले.
> त्यावेळी श्रीदेवी म्हणाली होती, डॉली तुझ्या हातात जादू आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सेलेब्ससोबत डॉलीचे फोटोज...