डेहराडून- भाजप आमदाराने अमानुष मारहाण केल्याने पोलिसांचा 'शक्तिमान' नावाचा घोड्याचा एक पाय कापावा लागला. दरम्यान, एका महिन्यापूर्वी त्याला कृत्रीम पाय (प्रोस्थटिक लेग) बसवण्यात आला. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, 45 दिवसांत तो स्वत:च्या पायांवर चालू शकेल, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉ. राकेश नौटिया यांनी बुधवारी दिली.
काय आहे प्रकरण..
> भाजपने भ्रष्टाचार व कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात विधानसभेवर मोर्चा काढला होता.
> 14 मार्च रोजी निघालेल्या या मोर्च्याला उत्तराखंड पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
> गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही पोलिस घोड्यावर आले होते.
> घोड्याने भाजप नेत्याला लाथ मारली होती, अशी माहिती आहे.
> डेहराडूनचे पोलिस अधिक्षक सदानंद दाते म्हणाले - व्हिडिओमध्ये आमदार गणेश जोशी लाठीच्या सहाय्याने घोड्याला मारताना दिसत आहेत.
> या घटनेनंतर आमदार जोशी आणि इतरांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'शक्तिमान'चे फोटोज...