आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्‍लॅमरस तरुणींनी केली हायटेक चोरी, मुंबईत जावून केले PhotoShoot...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी  मीनाक्षी पंत आणि अंशि‍का ठाकूर - Divya Marathi
आरोपी मीनाक्षी पंत आणि अंशि‍का ठाकूर
लखनौ - चंगळवादी आयुष्‍य जगण्‍याची चटक लागलेल्‍या दोन तरुणींनी आपल्‍या दोन मित्रांसोबत सीआरपीएफ अधिकाऱ्याच्‍या घरातून 25 लाख रुपयांची चोरी केली. त्‍यातून त्‍यांनी दुचाक्‍या आणि महागडे मोबाइल फोन खरेदी केले. एवढेच नाही तर यापैकी एका तरुणीने मॉडलिंगसाठी फ्लाइटने मुबंईला जावून फोटोशूटसुद्धा केले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक तरुण फरार आहे.
अशी पकडली चोरी...
> झारखंडमध्‍ये कार्यरत असलेले कमांडेंट रमेश कुमार यांचे लखनौमध्‍ये घर आहे.
> त्‍यांनी शेत जमीन विकून मिळालेले 25 लाख रुपये लखनौमधील घरात ठेवले होते.
> 20 जून रोजी त्‍यांनी आपल्‍या एका मित्राला कामानिमित्‍त त्‍या घरी जाण्‍याचे सांगितले.
> त्‍यांचा मित्र घरी गेला असता घरातील सामान अस्‍ताव्‍यस्‍त दिसले. त्‍याने या बाबत तत्‍काळ रमेश यांना माहिती दिली.
> त्‍या नंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.
> दरम्‍यान, याच घराच्‍या चौथ्‍या माळ्यावर राहणाऱ्या दोन तरुणींची पोलिसांनी संशयाच्‍या आधारे चौकशी केली.
> त्‍यांनी गुन्‍ह्याची कबुली दिली.

हाय प्रोफाइल आहेत चोर तरुणी
> पोलिसांनी अटक केलेल्‍या दोनही तरुणी चांगल्‍या घरातील आहेत. यापैकी मीनाक्षी पंत ही लखनौ विद्यापीठात एमबीएची विद्यार्थिनी आहे.
> मिनाक्षीचे वडील एचसीसीएल छत्तीसगडमध्‍ये लेखापाल आहेत.
> दुसरी तरुणी अंशिका ठाकूर ही सेठ विश्‍वभंरनाथ कॉलेजमध्‍ये बीबीएच्‍या शेवटच्‍या वर्षाला आहे. तिचा भाऊ सरपंच आहे.
> त्‍यांचा मित्र आणि या घटनेतील तिसरा आरोपी श्रीधर हा बाबू बनारसीदास कॉलेजमध्‍ये बीडीएसच्‍या तृतीय वर्षाला आहे. त्‍याचे वडील निवृत्‍त प्राध्‍यापक आहेत.
> शंतनू नावाचा चौथा आरोपी फरार असून, तोसुद्धा एमबीए करतो.
पोलिसांनी जप्‍त केले 17 लाख रुपये
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून 17 लाख रुपये जप्‍त करण्‍यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...