आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती होता झोपेत, प्रियकरासोबत पळाली पत्‍नी, पतीने म्‍हटले, \'सुखी राहा !\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - दानापूरवरून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कॅपिटल एक्‍स्‍प्रेसमध्‍ये 15 दिवसांपूर्वी आपल्‍या पतीला जबरदस्‍ती झोपवून मध्‍यरात्री एका बँक अधिकाऱ्याची पत्‍नी प्रियकरासोबत पळून गेली होती. तथागत कुमार असे बँक अधिकाऱ्याचे तर स्मिता असे त्‍याच्‍या पत्‍नीचे नाव आहे. गुरुवारी स्मिता आपला प्रियकर मृत्युंजय याच्‍यासोबत पाटण्‍यात परत आली आणि आपण आता पतीसोबत नांदणार नसल्‍याचे तिने सांगितले.
पतीने दिल्‍या शुभेच्‍छा...
स्मिता हिला तथागत यांच्‍यासोब लग्‍नच करायचे नव्‍हते. त्‍यामुळे तिने त्‍यांना सोडून प्रियकरासोबत पळ काढला. आता आपण आपल्‍या प्रियकरासोबत पाटण्‍यात राहणार असल्‍याचेही तिने सांगितले. त्‍यावर तथागत यांनी भावी आयुष्‍यासाठी तिला शुभेच्‍छा दिला. एवढेच नाही तर आपली तक्रारसुद्धा मागे घेतली.
ट्रेनमधून कुठे गेली होती स्मिता
स्मिता ही त्‍याचे पती तथागत यांच्‍यासेबत ट्रेनमधून सिलीगुडीला जात होती. प्रवासाला रात्री पतीला जरबरदस्‍ती झोपवून ती बेगुसरायमध्‍ये उतरली. त्‍या ठिकाणी तिचा प्रियकर आला होता. त्‍या नंतर ते दोघेही तिथून पहिल्‍यांदा उत्तर प्रदेश आणि नंतर जम्मू कश्मि‍राला गेले. तिथे काही दिवस राहिल्‍यानंतर ते पाटण्‍याला परत आले.
लहानपणापासून आहेत एकमेकांच्‍या प्रेमात
स्मिता आणि मृत्युंजय हे दोघेही लहानपणापासून एकमेकांच्‍या प्रेमात आहेत. शाळेत असताना त्‍यांच्‍या लव्‍ह स्‍टोरी खूप चर्चा होत होती. त्‍यामुळे मुख्‍याध्‍यापकांनी त्‍यांच्‍या पालकाकडे तक्रारही केली होती. त्‍या नंतर मृत्युंजयच्‍या वडिलांनी त्‍याला दुसऱ्या शाळेत टाकले. तरीही दोघे एकमेकांना भेटत असत.
त्‍या रात्री नेमके काय झाले होते...
> तथागत हे उत्‍तर प्रदेशातील एका बँकेत कार्यरत आहेत.
> त्‍यांनी कटिहार रेल्‍वे स्‍टेशनमध्‍ये पत्‍नी हरवल्‍याची तक्रार नोंदवली होती.
> त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले होते, तीन वर्षांपूर्वी पाटणा येथील स्मिता कुमारी (26 वर्ष) सोबत माझे लग्‍न झाले होते.
> सुट्या घालवण्‍यासाठी आम्‍ही उत्‍तर प्रदेशातून पाटण्‍यात आले होतो.
> येथून कॅपिटल एक्‍स्‍प्रेसने आम्‍ही दार्जिलिंगला फिरायला जात होतो.
> 23 मे रोजी बोगी क्रमांक ए वनमध्‍ये 33 आणि 35 नंबरच्‍या बर्थवर आम्‍ही बसलो होतो.
> राजेंद्रनगर स्टेशनवरून ट्रेन सुटली.
> मी 35 नंबरच्‍या तर माझी पत्नी 33 नंबरच्‍या बर्थवर झोपी गेली.
> मोकामा स्टेशनजवळ मला जाग आली असता स्‍म‍िता ही तिच्‍या बेडवर नव्‍हती, अशी माहिती तथागत यांनी दिली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, शोध घेतला सापडली नाही... पत्‍नीचीच प्‍लॅनिंग... स्मिताने केला होता वडिलांना कॉल
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)