आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helicopter Crash Near Katra In Jammu And Kashmir

वैष्णोदेवीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकासह सात भाविक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटरा (जम्‍मू) - वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असलेले भाविकांचे एक हेलिकॉप्टर आज (सोमवार) कोसळल्याने वैमानिकासह सातजण ठार झाले.

दुर्घटनाग्रस्‍त हेलिकॉप्‍टर हिमालयन हेली सर्व्‍ह‍िस कंपनीचे असून, सहा भाविकांना घेऊन वैष्‍णोदेवी मंदिराकडे जात होते. मात्र, आग लागल्‍याने ते लगेच कोसळले. या अपघातात महिला वैमानिकासह सहा भाविक ठार झाल्‍याचे वृत्‍त आहे.
मृतांमध्‍ये यांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या दुर्घटनेत अर्जूनसिंग, महेश, वंदना, सचिन, अमृतपाल यांच्‍यासह पाच वर्षांच्‍या अस्‍म‍िता हिचा मृत्‍यू झाला.
कसा झाला अपघात ?
> कटरा येथील पायथ्यापासून उड्डाण केल्यावर हेलिकॉप्टरला आग लागल्याने हा अपघात घडला.
> आग लागताच हेलिकॉप्टर खाली कोसळले.
> कटरा ते सांझी छतपर्यंत ही हेलिकॉप्टर सर्व्‍ह‍िस आहे. हे अंतर 10 किलोमीटर आहे.
> सांझी छत माता वैष्णो देवीच्‍या अगदी समोर आहे. या ठिकाणी एका खासगी कंपनीचे दोन हेलिकॉप्‍टर सेवा देतात.
> एका हेलिकॉप्टरमध्‍ये सहा व्‍यक्‍ती बसू शकतात. त्‍यासाठी प्रति प्रवासी 1500 रुपये भाडे आहे.
> कटरापासून सांझी छतपर्यंत पोहोचालयाला केवळ 3 मिनिटे लागतात.
> ज्‍येष्‍ठ नागरिक हेलिकॉप्‍टर सेवेला लाभ घेतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...