आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPS Garima Singh Appointed In Jhansi, Uttar Pradesh

25 व्‍या वर्षी झाली IPS, रात्री फि‍रत असताना पोलिसाने मागितली होती लाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांसी (उत्‍तर प्रदेश) - आयपीएस गरिमा सिंह यांच्‍याकडे झांसी पोलिस दलाची धुरा आली. वयाच्‍या 25 व्‍या आयपीएस झालेल्‍या गरिमा यांची ही पहिली पोस्टिंग आहे. कथौली या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्‍या गरिमा यांची ही यशोगाथा...
रात्री फिरत असताना पोलिसाने मागितली होती लाच...
> गरिमा यांचे शिक्षण दिल्‍ली विद्यापीठात झाले.
> त्‍यांनी 'भास्‍कर'ला आपल्‍या कॉलेज जीवनाच्‍या अनेक आठवणी सांगितल्‍या.
> गरिमा यांनी सांगितले, "डीयूमध्‍ये शिकत असताना एका मॉलमध्‍ये त्‍या मैत्रिणींसोबत फिरायला गेल्‍या. तिथून होस्‍टेलमध्‍ये परत येत असताना रात्री त्‍यांना उशीर झाला.
> रात्रीच्‍या गस्‍तीवर असलेल्‍या पोलिसांनी त्‍यांचा ऑटो अडवला.
> एवढ्या रात्री कुठून आला आणि कुठे जाता, असे त्‍यांनी विचारले. शिवाय आम्‍हाला 100 रुपयेही मागितले.
> आम्‍ही पैसे देण्‍यास नकार दिला तेव्‍हा त्‍यांनी घरी फोन करून सांगू, अशी धमकी दिली.
> आम्‍ही वाद घातला. त्‍यानंतर त्‍यांनी आम्‍हाला सोडून दिले.
> या प्रकारामुळे माझ्या मनात पोलिसांप्रति नकारात्‍मक भावना निर्माण झाली होती, असेही गरिमा यांनी सांगितले.
असे होते सुरुवातीचे करियर
> आयपीएस गरिमा सिंह यांच्‍याकडे आता झांसी पोलिस दलाची धुरा आली आहे.
> त्‍या बलिया जिल्‍ह्यातील कथौली या गावाच्‍या रहिवासी आहेत.
> त्‍यांना पोलिस अधिकारी नव्‍हे तर एमबीबीएसची पदवी घेऊन डॉक्‍टर व्‍हायचे होते.
>- गरिमा यांनी सांगितले, "माझे वडील ओमकारनाथ सिंह इंजीनियर आहेत. मी अधिकारी व्‍हावे, अशी त्‍यांची इच्‍छा होती. त्‍यांच्‍या सांगण्‍यावरून मी स्‍पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
> गरिमा यांनी दिल्ली विद्यापीठाच्‍या सेंट स्टीफन कॉलेजमधून बीए आणि एमए (इतिहास) केले आहे.
> त्‍यांनी पहिल्‍यांदा 2012 मध्‍ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्‍याच वेळी आयपीएस म्‍हणून त्‍यांची निवड झाली.
पोलिसांप्रति असे बदलले विचार
> एका पोलिसाने लाच मागितल्‍याने गरिमा यांच्‍या मनात पोलिसांप्रति नकारात्‍मक भावना निर्माण झाल्‍या होत्‍या. परंतु, काहीच दिवसांत त्‍यांचा दृष्‍टीकोण बदलला आहे.
> त्‍यांनी सांगितले, "एकदा माझा फोन हरवला होता. त्‍याची तक्रार देण्‍यास मी पोलिस ठाण्‍यात गेले. पोलिसांनी तत्‍काळ कारवाई करत माझा फोन शोधून दिला. तेव्‍हापासून पोलिसांप्रति माझा दृष्‍टीकोण बदलला.''
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, गरिमा यांचे फोटोज...